Government cancelled Hindi compulsory GR to prevent march – Uddhav Thackeray मुंबई| दिनांक ०५ जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात मोराचा आयोजित करण्यात आल्याने शासनाने हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत माहिती दिली आहे.


यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेल्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देत मराठी माणसाचा मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला असल्याचे उद्धव ठाकरें यांनी म्हंटले आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. परंतु आपल्या देशात भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे, त्या प्रांताच्या अनुसार तिथल्या मातृभाषेला सर्वोच्च मान दिलाच पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठीला मान मिळलाच पाहिजे. मराठी अमराठी गुण्यागोविंदाने नांदत असताना यांनी दोघात खडा टाकला.

पत्रकार परिषदे दरम्यान उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले कि, मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हारली असून, संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी सुद्धा असेच झाले होते. सरकारने मराठी माणसाची एकजूट तोडण्याचा प्रयत्न केला आणि मराठी व अमराठी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदी सक्तीला विरोध होता आणि आजही आहे.


आम्ही आंदोलन सुरु केल्यानंतर या आंदोलनाला मराठी माणसांचा एव्हडा मोठा पाठिंबा मिळेल याची त्यांना कल्पना नव्हती. तो मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने जीआर रद्द केला. 5 तारखेला आम्ही मोर्चा काढणार होतो, पण आता विजयी सभा आम्ही काढू कुठे कशी सभा असेल याबाबत आम्ही माहिती देऊ असे त्यांनी सांगितले.


