उस्माननगर,माणिक भिसे| येथील ग्रामपंचायत मधील आता पर्येत झालेल्या १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून झालेल्या कामाचे देयके कोणाला ही देऊन नये अशी मागणी गजानन सुर्यवाड यांनी उस्माननगर ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कडे निवेदनाव्दारे केली आहे.


ग्रामपंचायत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , मागील सात ते आठ दिवसांपासून उस्माननगर ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाच्या चौकशीसाठी दिलेल्या तक्रारीची प्रत वर्तमानपत्रातील ( प्रती) कात्रणं सार्वजनिक व समाज माध्यमांमध्ये ( व्हाट्सअप ) सोशल मिडियावर (व्हायरल) फिरत आहे . ज्यामुळे गावाची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभारा बद्दल प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.


त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे सर्व प्रकरण जाहीर सार्वजनिक सभेत स्पष्टीकरण द्यावे ., व या सर्व ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आलेल्या कामाची वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडून निष्पक्षपणे चौकशी करून त्याचा अहवाल विशेष सभा बोलावून गावकऱ्यांच्या समोर सार्वजनिक करावे . व उस्माननगर ता. कंधार ग्रामपंचायत कार्यालय मार्फत झालेल्या कोणत्याही कामाचे देयके अदा करू नये ., अदा केल्यास ग्रामपंचायत कार्यालय येथील सचिव तथा ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच जबाबदार असतील . अशी मागणीचे निवेदन गजानन सुर्यवाड यांनी ग्रामपंचायत अधिकारी उस्माननगर यांच्या कडे केले आहे.




