उस्माननगर l लोहा तालुक्यातील मौजे कामळज शिवारातील नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या ठिकाणी महसूल व उस्माननगर पोलीस प्रशासनाने संयुक्त रित्या बुधवारी छापा टाकून उस्माननगर पोलिसांनी बायबरच्या चार बोटी , ६० लाख रुपये किंमतीच्या आणि चार छोट्या इंजन चाळीस लाख रुपये असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार जणाविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


येळी , व कामळज परिसरातील शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रंदिवस रेती तस्कर अवैधरित्या रेतीचा उपसा इंजिन बोटीच्या साह्याने करीत आहेत. त्यासाठी परप्रांतीय मजुरांना कामाला लावण्यात आले. या भागातील रेती तस्कर हे काही राजकीय पुढाऱ्यांच्या जवळचे असल्याने सर्सपणे त्यांचा हा धंदा सुरू आहे .येळी माहाटी. याठिकाणी खुलेआम पणे रेतीचा उपमा सुरु आहे .



मौजे कामळज ता.लोहा शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा करीत असल्याची माहिती महसूल प्रशासन व उस्माननगर पोलीस प्रशासनाला मिळाली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार , अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव , अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील , पोलिस उपअधीक्षक ( उपविभागीय पोलिस अधिकारी) डॉ आश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे सपोनी संजय निलपत्रेवार , सपोउपनि गजानन गाडेकर तसेच मुदखेड , कुंटूर पेथील पोलीस अधिकारी , कर्मचारी व महसूल विभागाने कामळज शिवारातील गोदावरी नदीच्या काठावर संयुक्तपणे छापा टाकला.



इंजिनच्या साह्याने नदीपात्रातून रेतीचा उपसा सुरु होता. पोलीमसाना पाहून रेती तस्कर शंकर प्रकाश भरकडे, संतोष ज्ञानेश्वर भरकडे रा. , कौडगाव , संजय शेषेराव जाधव रा.चिचोली भगवान पंडीत रा. मारताळा हे पळून गेले. उस्माननगर पोलिसांना घटनास्थळी चार मोठ्या बोटी , इंजिन सह लहान चार बोटी असा एक कोटी रूपयाचा ऐवाज आढळून आला.

चारही रेती तस्कर हे अनेक दिवसांपासून फायबर बोटी व इंजन लावून नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा करीत होते . सदरील रेती नदी पात्राजवळ असलेल्या शेतात साठा करून नंतर जादा दराने विक्री करीत असतात . फौजदार मुंडे यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून तस्कर शंकर भरकंडे , संतोष भरकडे, संजय जाधव व भगवान पंडीत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उस्माननगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनि संजय निलपत्रेवार, सपोउपनि गाडेकर गजानन , हंबर्डे , गंगाधर चिंचोरे , प्रकाश पेद्देवाड माधव पवार,राठोड यांनी केली .


