Kamalaj ; कामळज येथील गोदावरी नदी घाटावरून चार इंजिन आणि चार बोटी सह एक कोटीचा मुद्देमाल जप्त. पोलीस व महसूल पथकाची संयुक्त कारवाई;
उस्माननगर l लोहा तालुक्यातील मौजे कामळज शिवारातील नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या ठिकाणी महसूल व उस्माननगर पोलीस प्रशासनाने संयुक्त रित्या बुधवारी छापा टाकून उस्माननगर पोलिसांनी बायबरच्या चार बोटी , ६० लाख रुपये किंमतीच्या आणि चार छोट्या इंजन चाळीस लाख रुपये असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार जणाविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येळी , व कामळज परिसरातील शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रंदिवस रेती तस्कर अवैधरित्या रेतीचा उपसा इंजिन बोटीच्या साह्याने करीत आहेत. त्यासाठी परप्रांतीय मजुरांना कामाला लावण्यात आले. या भागातील रेती तस्कर हे काही राजकीय पुढाऱ्यांच्या जवळचे असल्याने सर्सपणे त्यांचा हा धंदा सुरू आहे .येळी माहाटी. याठिकाणी खुलेआम पणे रेतीचा उपमा सुरु आहे .
मौजे कामळज ता.लोहा शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून रेती...
