श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| संवगडी, शाळेचा वर्ग, शिक्षक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करुन असते. ति बालपणीची शाळा सोडून ३० वर्ष झालेल्या विद्यार्थी नि पुन्हा त्याच वर्ग खोलीत बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वांरवार येतेच. म्हणुनच श्री जगदंबा हायस्कूल माहूर येथील १९९४-९५ च्या बॅच चे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ३० वर्षां पुर्वीची शाळेतील मस्ती, एकत्रीतपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंम्मेलने व सांस्कृतीक कार्यक्रमाची धुम इत्यादी विषयावर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत ओघातच आपण इतके मोठे झालो याचे क्षणभर विस्मरण झाले.


विद्यार्थ्यांचे शालेय जीवन हे त्यांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असतात कालांतराने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटा धराव्या लागतात आणि आपले आवडते शिक्षक मित्र-मैत्रिणी यांच्यापासून दूर जावे लागते. पुन्हा कधीतरी ते भेटतील कि नाही याची शाश्वती पण नसते मात्र माहूर शहरातील श्री जगदंबा हायस्कूल च्या शाळेत १९९४-९५ मध्ये दहावीत शिकणाऱ्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल ३० वर्षांनंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली व या अविस्मरणीय,भावनिकक्षणांचे साक्षीदार झालेत.



माहूर शहरातील निसर्ग सौंदर्यानी नटलेल्या श्री दत्त शिखर संस्थान च्या पर्यटन सुविधा केंद्र च्या परीसरात दि १४ सप्टेंबर रोजी या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.


प्राचार्य अरूण कोरटकर.यांनी या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. शेषेराव आमले,राठोड सर, अशोक दवने,कोडिंबा खांडेकर, केशवराव पोपूलवार,प्रभावती जोशी, मगंला मुनेश्वर मॅडम,भावड़े सर, शिपाई रामराव मामा,काबळे मामा,( सर्व सेवानिवृत्त) व विघंमान मुख्याध्यापक विश्वास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती ,सर्व शिक्षकांचा शाल- श्रीफळ, हार व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यादान करणाऱ्या सर्व गुरुजनांचे पुष्पाचे वर्षाव करून स्वागत करण्यात आले.

सोबत शिकलेले काही विद्यार्थी मित्र व शिक्षक मृत्त पावले त्यांना पसायदान घेऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आयोजक अशिष जयस्वाल,राज ठाकूर,विजय कामटकर,जगदिश आराध्ये, गजानन जयस्वाल, वंदना जाधव,प्रणाली जोशी, या विद्यार्थीनी आयोजित स्नेहमेळावा (गेट टूकेदर).ला ६७ माजी विद्यार्थीनि आपल्या परीवारास उपस्थित होते.
पाचवी ते दहावी पर्यंत सोबत शिक्षण घेतलेले सहमित्र विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, प्रशासन, सांस्कृतीक,आदर्श शेतकरी, सामाजिक व अनेक व्यवसाय क्षेत्रात काम करीत असुन त्यांनी आपल्या कामाचा उंच ठसा उमटवला आहे. गणवेशात सर्व माजी विद्यार्थी शाळेत एकत्र आल्यावर राष्ट्रगीताने शाळा सुरू झाली. वर्ग खोलीत बसून विद्यार्थी जिवनातीत आनंद व्यक्त केला, कार्यक्रमाचे सुत्र संचालन अजंली कोरटकर तर आभार प्रदर्शन अशिष जयसवाल यांनी केले व प्रसंगानुरूप भेटत राहण्याचा संकल्प करुन निरोप घेतला.


