नवीन नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपले प्रथम लक्ष सिडकोच्या मुख्य मार्गाकडे वेधले असून पहिल्याच कारवाईत रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना दुकाने हलवावी लागली. मनपाला जे जमले नाही ते पोलिसांनी करून दाखविले अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतूं उमटत आहे.
सिडकोच्या मुख्य मार्गावर फळ विक्रेता,भाजीपाला विक्रेता व ईतर हातगाड्यानी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अण्णाभाऊ साठे पुतळा दरम्यान बस्तान मांडल्याने वाहतुकीची नेहमी कोंडी निर्माण होत होती,परंतु मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असत.दरम्यान नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर रुजू होताच ओमकांत चिंचोलकर यांनी रस्त्यावरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले आणि रस्त्यावरील अतिक्रमण दूर केले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्यासह पोलिस फौजफाटा रस्त्यावर उतरला होता.या कारवाईमुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतला आहे,तर गुरुवारचा आठवडी बाजार हा नेमून दिलेल्या मोकळ्या मैदानावरच भरेल रस्त्यावर दुकाने थाटल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.