नांदेड/बिलोली| नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक हजरत नवाब सरफराज खान शहीद मस्जिद दर्गाच्या हौजे ए खास विहिरीवर व परिसरात अवैध बांधकाम करून शौकत मंगल कार्यालय,शौचालय,टिनपत्राचे दुकाने उभारून संरक्षित स्मारकाचे विद्रूपीकरण करणा-या अतिक्रमण धारकावर फौजदारी गुन्हे दाखल करून अतिक्रमण निष्काशीत करण्याची मागणी तहरीक ए औकाफ संघटनेच्या वतीने अध्यक्ष शब्बीर अन्सारी नेतृत्वात शिष्यमंडळाने दि.४ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे केली आहे.


मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक हजरत नवाब सरफराज खान सहाब मस्जिद दर्गा नगरखाना कब्रस्तान च्या परिसरात येथील स्थानिक भूमाफिया तथा स्वयघोषित वारसदार हे स्वतःच्या लाभापोटी राज्य संरक्षित स्मारक परिसराच विद्रूपीकरण करून शौकत मंगल कार्यालय बांधून या मंगल कार्यालयाचे शौचालयाचे बांधकाम हे राज्य संरक्षित स्मारकाच्या हौजे खास विहिरीवर करण्यात आले आहे तसेच याच विहिरीच्या दुस-या बाजूने टिन पत्र्याचे दुकाने काढून वाटर प्लांट सुरु असून या प्लांटमुळे संपूर्ण परिसर हे दुर्गंधीयुक्त झाले आहे.वाटर फिल्टरचे क्षारयुक्त घाण पाणी हे विहीमध्ये सोडले जात आहे.



या मंगल कार्यालयात कोणताही कार्यक्रम असला तर येथे फटाके, रॉकेट आकाशात सोडतात त्यामुळे येथील मस्जिद परिसराची शांतता भंग होत आहे.या रॉकेट आणि फटाक्यामुळे प्रदूषण होत आहे तसेच ही ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक असल्यामुळे या रॉकेट फटाक्या आतिषबाजीमुळे भविष्यात या स्मारकास हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे मंगल कार्यालय चालविणा-यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करून पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार येथील राज्यसंरक्षित स्मारकाच्या परिसरातील सर्व अतिक्रमण निष्काशीत करून हे परिसर श्रद्धालुभाविक,पर्यटक यांच्यासाठी खुले करून देण्यात यावे.



येत्या दहा दिवसात या तक्रारीची दखल नाही घेतल्यास यासंबधी वरिष्ठ कार्यालयात व मंत्रालयावर लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्यात येईल असा ईशारा तहरिक ए औकाफ संगठनेतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला.या निवेदनावर संगठनेचे सय्यद मोईनोद्दीन (मोईनसेठ),शेख.मुश्ताक अहेमद,मिर्झा आजमबेग,मो. रफिक काजी, अजमत बेग, ॲड हमीद आदिंचे नाव व स्वाक्ष-या आहेत….



