Saturday, June 27

Tag: Tehreek-e-Auqaf

ehreek-e-Auqaf : शौकत मंगलकार्यालय चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – तहरीक ए औकाफ

ehreek-e-Auqaf : शौकत मंगलकार्यालय चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – तहरीक ए औकाफ

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/बिलोली| नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक हजरत नवाब सरफराज खान शहीद मस्जिद दर्गाच्या हौजे ए खास विहिरीवर व परिसरात अवैध बांधकाम करून शौकत मंगल कार्यालय,शौचालय,टिनपत्राचे दुकाने उभारून संरक्षित स्मारकाचे विद्रूपीकरण करणा-या अतिक्रमण धारकावर फौजदारी गुन्हे दाखल करून अतिक्रमण निष्काशीत करण्याची मागणी तहरीक ए औकाफ संघटनेच्या वतीने अध्यक्ष शब्बीर अन्सारी नेतृत्वात शिष्यमंडळाने दि.४ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे केली आहे. मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक हजरत नवाब सरफराज खान सहाब मस्जिद दर्गा नगरखाना कब्रस्तान च्या परिसरात येथील स्थानिक भूमाफिया तथा स्वयघोषित वारसदार हे स्वतःच्या लाभापोटी राज्य संरक्षित स्मारक परिसराच विद्रूपीकरण करून शौकत मंगल कार्यालय बांधून या मंगल कार्यालयाचे शौचालयाचे बांधकाम हे राज्य संरक्षित स्मारकाच्या हौजे खास विहिर...
error: Content is protected !!