शिवणी, भोजराज देशमुख। किनवट तालुक्यातील ईस्लापूर येथील ज्वारी खरेदी केंद्राची शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्याची मुदत 30 जून रोजी मुदत संपली या मुदतीस एक महीन्याची मुदतवाढ मिळावी अशा स्वरूपाची मागणी कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे केली होती. शेतकर्याचे हित लक्षात घेऊन ज्वारी खरेदी केंद्राला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ व 25000 क्किटल वाढीव उदिष्ट मिळाल्याने कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांच्या मागणीला यश आले आहे.
किनवट तालुक्यातील ईस्लापूर परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदी करण्यासाठी 735 लाभार्थींनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली त्यापैकी फक्त 130 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केंद्रात खरेदी करण्यात आली आहे. 60 टक्के शेतकर्याची आजही ज्वारी खरेदी करणे बाकी आहे. या अनुषंगाने कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांनी ज्वारी खरेदी केंद्राला एक महीन्याची मुदतवाढ मिळावी व 25000 क्किटल वाढीव उदिष्ट मिळावे अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेऊन खासदार नागेश पाटील यांनी केद्र सरकार व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून ईस्लापूर येथील ज्वारी खरेदी केंद्राला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ मिळवून दिली. व 25000 क्किटल वाढीव उद्दीष्ट मंजूर करून घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांच्या मागणीला यश आले आहे.