हदगाव/नांदेड। हदगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी आज खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी केली या प्रसंगी काही उमेदवार तर काही उमेदवारांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
गुजरात क्डॅरचे चे २००९ बॅचचे आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे हे सुरत येथे आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव,भोकर,नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. मयंक पांडे (आयआरएस) यांचा संपर्क मोबाईल क्रमांक ०८४८३८४५२२० आहे.तर त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदचे नांदेड चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना मो.नं ९०११०००९२१ हे आहेत.
खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी आज उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी करून मार्गदर्शक सूचना दिल्या याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा हदगावच्या तहसिलदार श्रीमती सुरेखा नांदे, सहायक खर्च निरीक्षक गणेश पुजारी, खर्च विभागाचे पथक प्रमुख सचिन कद्रे आदी उपस्थित असल्याचे मिडिया कक्षातील ए.एम.तामसकर,अनिल दस्तूरकर यांनी कळविले आहे.