लेखमालेला वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला वाचून वाचकांनी दिलेल्या असंख्य प्रतिक्रिया पैकी जागेअभावी निवडक प्रतिक्रिया या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे. – संपादक
माणिक गुमटे
समयसूचकता, वेळेवर योग्य तो निर्णय घेणे, लीडरशिप, प्रसंगावधान, आणि सगळयांना बरोबर घेऊन चालणे हे सगळे गुणधर्म एकाच व्यक्ती ठिकाणी येणे तसे पाहिले तर क्वचितच पाहायला मिळते. भाऊ, ईश्वराने, विधात्याने हि वरील गुणवत्ता तुम्हाला प्रदान केली आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक गुण जसे सामाजिक कार्य, गरीबां बद्दल असलेली दया, ममता, प्रेम आणि विविध प्रकारची कामे यशस्वी रीत्या पुर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आहे. त्या मुळे काश्मीर, श्री अमरनाथ यात्रा, वैष्णव देवी यात्रा, सोबत दिल्ली, आम्रूतसर, हे सगळे शंभर यात्रेकरू ना सोबत घेऊन यशस्वीपणे पूर्ण करणे हे केवळ तुम्हालाच जमते.
अनेकजण यात्रा काढतात, पण सातत्याने तेवीस वर्षे श्री अमरनाथ यात्रा सुखरूप पणे घडवून आणणे हे एक रेकार्ड असेल. अडचणीतून मार्ग कसा काढावा हे तुमच्या कडून शिकले पाहिजे भाऊ. काश्मीर सारख्या संवेदनशील राज्यात ऑल इज वेल तुम्ही करून घेता. खरोखरच ही दैवी देणगी आहे भाऊ तुम्हाला. आपल्या 16 व्या यात्रेत बुरहान वाणी चे एन्काउंटर झाले तेव्हाचा प्रसंग आठवला कि सगळा प्रकार डोळयासमोर एखाद्या सिनेमा प्रमाणे झरझर येतो. ग्रेट आहात भाऊ तुम्ही.त्रिवार अभिनंदन भाऊ… बर्फानी बाबा चे दर्शन सुलभ, सुरळीत आणि आनंदात झाले. आपल्या कर्तत्वात आणखी एक शिरपेचात यशाचा तुरा खोवला गेला. वाहवा! खुप छान.
प्रा. धनंजय देशपांडे , पुणे
आपले संपूर्ण लेख मी दररोज वाचत होतो.उद्या काय होईल याची उत्सुकता मनाला लागली होती. एकदा अमरनाथ यात्रा पूर्ण केली तर जीवनाचे सार्थक झाले असे सर्वांना वाटते. तुम्ही तर तेवीस वेळा अमरनाथचे दर्शन घेतले आणि एका दिवसानंतर परत २४ वी यात्रा घेऊन जात आहात हे कल्पनेच्या पलीकडे आहे. दरवर्षी शेकडो यात्रेकरूंची विशेषत: जेष्ठ नागरिकांची यात्रा आपल्यामुळे सुखरूप पार पडत आहे.
याचाच अर्थ दैवी शक्ती तुमच्या पाठीमागे आहे. तुमची समय सूचकता, हजर जबाबीपणा आणि नियोजन किती अचूक आहे याची प्रचिती वाचताना पदोपदी जाणवते. प्रवासात वेगवेगळ्या राज्यातील व्यक्ती 100 लोकांसाठी दरवर्षी जेवणाची व्यवस्था करतात याचा अर्थ तुम्ही किती चांगले संबंध त्यांच्यासोबत जोडले आहे हे दिसून येते. तुमच्यासोबत गेलेल्या यात्रेकरूंच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर असे वाटते की, तुमच्यावर एकही व्यक्ती नाराज नाही. मोठ मोठ्या ट्रॅव्हल्स कंपन्या भरमसाठ शुल्क आकारून देखील जे समाधान देऊ शकत नाहीत ते तुम्ही माफक दरात देता हे कौतुकास्पद आहे. तुमचे लिखाण इतके दर्जेदार आहे की, तुमच्या अनुभवावर आधारित तुमचे आत्मचरित्र लिहिले तर मराठी साहित्यात मोलाची भर पडेल यात शंका नाही. पुढील वर्षी आम्ही अमरनाथ यात्रेला तुमच्यासोबत येणार हे आत्ताच ठरवले आहे. खूप खूप शुभेच्छा.
सुधीर विष्णुपुरीकर
अमरनाथ गुहेतून ह्या लेखमालेचे पूर्ण तेरा भाग वाचत असताना मी अक्षरशः भूतकाळात जाऊन 3 वर्षापूर्वी यात्रेतील प्रसंग अनुभवीत होतो. यात्रेची दैंनदिनी वाचत असताना प्रत्यक्ष यात्रा केल्याचे जाणवत होते. भाऊ सोबत यात्रेचा अनुभव म्हणजे एक अद्भुत अनुभूती आहे.90 यात्रेकरूना घेऊन सुरक्षित व सुखकारक यात्रा करणे व तीही अमरनाथ सारखी खडतर म्हणजे काय दिव्य आहे हे आम्ही स्वतः अनुभवले आहे.पण भोलेबाबाची कृपा भाऊवर असल्याने ते दिव्य सतत 23 वर्षे पार पडत आहे. भविष्यात पण त्यांचा हा भक्ती यज्ञ सुरू राहील ह्या विषयी खात्री आहे.परत एकदा अमरनाथ यात्रा करावी असे वाटते. बघुया शेवटी भोलेबाबांची इच्छा.चारधाम यात्रेसाठी मात्र तुमच्या सोबत यायचे आहे.
प्रा. भानुदास बिरादार, माणगाव जि.रायगड
खूप छान लेखन….एवढ्या व्यस्त दिनचर्येत लिखाणासाठी वेळ कधी व कसे काढता?…एकदा आपल्या सोबत अमरनाथ यायची बर्याच वर्षापासून इच्छा आहे. शाळा कॉलेज सुरू असतात त्यामुळे शक्य होत नाही.बघु कधी योग येतो…पण आपले दररोजचे लेख वाचून मनस्वी आनंद होतो. प्रत्यक्ष यात्रा केल्यासारखे वाटते.धन्यवाद…असेच लिहीत रहा…
भगवान केंद्रे
दिलीप भाऊ,तुमच्या सोबत माझी ही भोलेनाथ बर्फवाले यांची यात्रा झाली.प्रत्यक्षात गुलमर्ग व वैष्णोदेवी चे दर्शन घेतल्यासारखे वाटले.सुंदर शब्दांकनात अतिशय सुरेख प्रवास वर्णन.अभिनंदन सर्वांचे व खासकरून आपले.तुमच्या मुळे व इतर सर्व दानशूर अन्नदात्यांमुळे यात्रा सुखरूप पार पडली.
कधी तुमच्या बरोबर करू एक टूर
नंदकुमार मुरुगकर, मुंबई
मस्त लिहिलंय भाऊ. मला तुमच्या बरोबर अमरनाथ यात्रेची आठवण झाली. दर्शन सर्वांचे झाले खुप बर वाटल. वापसी प्रवासा साठी शुभेच्छा.
डॉ.अच्युत बन
भाऊ, किती वर्षे झाली या सदराला सुरू करून!
तुमचं निरिक्षण आणि शब्दांकन दरवेळेस नवीन वाटते.रंजकता भरपूर आहे.
मानलं भाऊ तुम्हाला ओघवते लिखाण!
भारी घोडदौड भाऊ!! मान गए
विजय अतकुलकर
आदरणीय भाऊ धन्यवाद आपण मला अमरनाथ च्या गुहेतुन हा तुम्हीं लिखाण केलेले लेख पाठवलात. हे लेख मी दरवर्षी न चुकता वाचत असतो. कारण तुमची व सर्व यात्रेकरूंची ख्याली खुशाली कळते व तुम्हीं केलेली सर्व मज्जा हास्य विनोद व सर्वच बाबी समजते.
अशोक शर्मा
ठाकुर सहाब, आप बहुत तकदीरवाले है , भलेही आपने धन दौलत ना कमाई हो , पर आपने अपने साथ मे जाने वाली जमा पुंजी बहुत कमाई है ,23 बार अमरनाथ के दर्शन बहोत बडा वरदान है आपको, आप नांदेड वासियों के तो लाडले हो ही,पर भगवान के भी लाडले हो, हमारा सौभाग्य है की आप नांदेड के हो
मीरा राजपूत, कोल्हापूर
फारच सुंदर, ओघवत्या शब्दात वर्णन केले आहे, वाचताना गुंग होऊन जातो, असे वाटते,आपण देखील त्या प्रवाशांसोबत आहोत असे वाटते.
स्नेहलता जायस्वाल, हैदराबाद
आप के द्वारा लिखित आर्टी कल बहुत बढ़िया है। छोटी सी बात भी बडी़ ही स्पष्टता से समझाई गयी हैं। मैं तो इन्तजार ही कर रही थी कि आप यह लेख कब भेजोगे, इसे पढते समय ऐसा लग रहा था कि सभी दृश्य आंखों के समक्ष प्रस्तुत किया जा रहा है।
आपकी यही विशेषता है कि आप किसी को भी बोर होने नहीं देतें और लोगों का दिल जीत लेते हो,यहीं वजह है कि, मेरे सहित हर कोई चाहता हैं कि आप हमेशा हर ट्रीप में यात्रियों के साथ रहे। मेरे कुछ फ्रेंड्स ने मुझसे कहाँ कि दिलीप ठाकुर ट्रीप में साथ रहेंगे तो ही जायेगें क्योंकि आपका आयोजन, भाषा, जिम्मेदारी, अनुभव , निष्पक्ष व्यवहार, व्यवस्था और सामंजस्य स्थापित करने में आप माहिर हो । अयोध्या के ट्रीप में कुछ लोगों ने नाराज़गी दर्शाई थीं।
आप अकेले कईयों को आसानी से मैनेज कर लेते हो
” Really heads of to your Manegment. “
हर चीज इतनें आसानी से आप कैसे कर लेते हो ? हो न हो आपको दैविक शक्ति ही मिलीं हैं, जिसके वजह से कठिन से कठिन काम करने मे भी आप सफल हो जाते हो, आसान काम नहीं है सौ वो लोगों को एक आदमी ने सभाल ना। दाद देती हुं आपके एनर्जी लेवल और सहनशीलता की।
आप जहाँ भी जाते हो, कुछ न कुछ नयें नयें कारनामे कर्मवीरों की तरह कर दिखा देते हो। मुझे तो ऐसा लगता हैं, आपकी एक आवाज़ पर हजारों लोग आपकी मदद के लिए खुशी खुशी से आयेंगे। आप एक अविस्मरणीय जादुगर हो। सदैव ऐसे ही रहे। साथ ही एक रिक्वेस्ट हैं गुजरात, राजस्थान और मध्यप्रदेश के डिटेल्स सेंड कीजिएगा। एकबार फिर कहतीं हुं आप जैसा कोई मैंने न देखा है, न ही देखुँगी।
नंदलाल मामोडे सर, छ.संभाजी नगर
क्या बात है. अचूक नियोजन आणि तंतोतंत तेवढीच अचूक अंमलबजावणी. ब्रेव्हो भाऊ…
रोहित पाटील
दिलीप भाऊ तुम्ही लेख लिहिलेला लेख हा मी पूर्णपणे मन लावून वाचला मला खूप छान वाटलं मन भरून आलं वाचताना अशी जाणीव झाली की मी स्वतः दर्शन करून आलो असं वाटले आणि मला केलेल्या पूर्वीच्या दर्शनाची आठवण आली.
संजय केंद्रे
वाचणार्या व्यक्तीस तुमचे हे वर्णन नाही, चित्रण वाटते. खरोखर चित्रण पाठवता आले तर वाचणार्यांचा आनंद आणि दर्शन ईच्छा द्विगुणित होईल. कारण वाचणारा प्रत्येक जण आपल्या मित्राना पाठवत असणारच.
मुखेडकर
खुपच छान लेख वर्णन आपण दुसरे वर्ष गेलो होतो तेंव्हाच आठवत आहे पुर्ण समोर उभे केलेले सगळं आठवतं. अजुनही तेवढीच तयारी आणि प्रोत्साहन देत घडवता आताचं तर छानच झाले नियोजन
रामलाल पवार संभाजीनगर
अमरनाथ गुहेतून चे सर्व भाग वाचले… अतिशय सुंदर आणि छान लिखाण… दिलीप भाऊ… तुमच्या बरोबर आम्ही पण अमरनाथ यात्रा करीत आहोत असा सतत भास होत होता… अतिशय सुंदर वर्णन…
चित्रकारका हनुमान
अप्रतिम.सर इतक्या सुंदर पणे दृश्य उभे केले आहे की तुमच्या ग्रुप मध्ये एकदा तरी अमरनाथ यात्रेला जावेसे वाटते. मनात असे सुद्धा वाटते तुम्ही tour organiser aahat की लेखक..
डॉ. जगदीश देशमुख
वर्णन खूप सुंदर.भाऊ पुढील वर्षी आम्हा दोघांनाही यायची ईच्छा आहे, आपल्या सोबत.
संजीव कोटलवार
फारच सुंदर वाचन करून असे वाटले की आम्हाला केव्हा योग येईल तुमच्या सोबत जाण्याचा खरंच केव्हा ही अमरनाथ ला जायचं ठरले तर तुमच्या सोबत च येईन अप्रतिम एवढी काळजी घेऊन तुम्ही जे यात्रेकरुणा नेओन आणता त्याबद्दल कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे ही पण एक समाज सेवा आहे ईश्वर तुमच्या वर असाच प्रसन्न राहो हिच प्रार्थना…
डॉ. एस.जी.क्षिररसागर
आपण अमरनाथ यात्रेचा वृत्तान्त खुपचं चांगल्या शब्दात मांडत आहात… आता पर्यंतचे सर्व भागाचे उत्कृष्ट लिखाण झाले आहे.. आपण दरवर्षी यात्रेचे नियोजन करता त्या यात्रेतील आठवणी, अडचणी, सुखद अनुभव, यात्रेकरूंच्या आठवणी इत्यादी पुस्तक रुपात अवतरल्या तर खूप चांगले होईल. आपली मांडणी सुंदर आहे. वाचत असताना आम्ही तुमच्या सोबतच आहोत असे वाटत आहे..
सुषमा हूरणे
खुप सुंदर वर्णन वाचून कधी जायला मिळणार हाच विचार मनात सतत येत राहतो तुमच्या बहिणीसाठी वैष्णवी देवीला प्रार्थना करा तिला पुढच्या वर्षी दर्शन घडावे
दीपा पंढरपूरकर
खूप छान याञा,प्रवास नियोजनबद्ध वाचूनच आनंद होतो….
संजय सूर्यवंशी
भाऊ छान अमरनाथ प्रवास वर्णन. जणू काही आम्ही सर्व हे आपल्या सोबत पर्यटन करत आहोत व पहात आहोत असे हे लेख वाचून वाटते.
रमेश पाटील पळसेकर
अमरनाथ यात्रा अतिशय सुखरूप पार पाडून. सर्व यात्रेकरूंना सुखरूपपने ज्याच्या त्याच्या इच्छित स्थळी पोहचाविलेत. अतिशय आनंदी, उत्साही, वातावरणांत,खेळी मेळीच्या वातावरणांत यात्रा संपन्न केलीत,त्या बद्दल, दिलीपभाऊ आपले धन्यवाद, शुभेच्छा, आणि अभिनंदन. भाऊ,तुमच्या लेखा मुळे आम्हाला सुद्धा घर बसल्या अमरनाथ यात्रा घडली. धन्यवाद.
किशोर पाठक
अभिनंदन भाऊ, आपला प्रवास सुखरूप झाल्याबद्दल. सुंदर प्रवास अनुभव, उत्कृष्ट लेख लिहित आहात आपण
डॉ.सुनीता गोधमगावकर, बिलोली
मस्त यात्रा वर्णन.. डोळ्यासमोर सर्व दृश्य.. घरी बसुन अमरनाथ यात्रा करवली आमची…
शिवराज पाटील मालेगावकर
एकदम मस्त यात्रा केलात… या लेखावरुन असे वाटते की हि अविस्मरणीय क्षण,अनूभव कायमस्वरूपी डोळ्यात राहील अशी यात्रा केलात.. आपली सेवा कोणीही विसरून जाणार नाही.. आपले खुप खुप धन्यवाद. आपल्या माध्यमातून उत्तरोत्तर सेवा घडो या माध्यमातून आपली सदैव प्रगतीचा आलेख उंचावत जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो.
रवी पाटील कावलगावे
भाऊ अमरनाथ यात्रेला सोबत आल्यासारखा अनुभव आपल्या या लिखाणातून येतो.
दिपकसिंह गौर, रिटायर्ड डीवायएसपी
Very very nice work,This happened one and only your hard work and devotion.Abhinandan. Please keep it up.
किरण रेणगुंटवार
छोटा पॅकेट बडा धमाका..छोटे मोदी की जय हो.. भाऊ है तो सब मुमकिन है..
विजयकुमार विठ्ठलराव अतकुरकर
आदरणीय भाऊ तुमचे हे अमरनाथ च्या गुहेतुन लेख वाचून मन प्रसन्न तर झालेच. तुम्हीं सर्वजण यात्रेकरु यात्रा सुखरुप करुन आलात याचे समाधान वाटले. आदरणीय भाऊ तुम्हीं दरवर्षी योग्य व पध्दतशीर आगदी काटेकोरपणे नियोजन करता. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी पासुन लक्ष ठेवता, म्हणूनच ही यात्रा भोले बाबांच्या कृपेने व आशिर्वादाने संपन्न होते. तुमच्या ह्या पवित्र कार्याला कोटी कोटी प्रणाम करतो. तुमच्या सोबत खंबीरपणे साथ देणारे आदरणीय श्री.राजुभाऊ ठाकुर हे नेहमी लक्ष्मणासारखे नेहमी सोबत आहेत हे ही तितकेच सत्य आहे. तुम्हां दोघांना मनापासून कोटी कोटी प्रणाम. तुमच्या ह्या पवित्र शुभ कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो व लेखणीला विराम देतो. धन्यवाद.
रणजीत धर्मापुरीकर
फारच छान वृत्तांत. पुढच्या ट्रीपला नक्की येतो.
ज्योती पडगलवार
अप्रतिम लेख वाचून आनंद झाला व प्रत्यक्ष जाऊन आल्या सारखे वाटत आहे.
जयश्री देवराज
Excellent articles & trip. Congrats Dilip bhaiya. Super managment.
सौ. कुसुम पवार किन्हाळकर
सर आपण प्रवास वर्णन अतिशय छान करता,वाचताना अस वाटत की आपण प्रत्यक्ष अनुभवच घेत आहेत . फार पूर्वीपासूनच मी आपले हे प्रवास वर्णन प्रजावाणीत वाचत आली आहे आणि प्रत्येक वेळी पुढचा भाग वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे .खर सांगायच तर मी २०१२ साली अमरनाथ यात्रा तुमच्या ग्रुप सोबत करण्याची खुप इच्छा असूनही जागा नसल्यामुळे वेगळी केली. तरी देखील माझ्या अमरनाथ यात्रेचे श्रेय तुम्हालाच द्यावे लागेल.कारण तुमची प्रजावाणीतील लेखमाला वाचूनच अमरनाथ दर्शनाची ईच्छा निर्माण झाली. आता तुमची लेखमाला वाचून असे वाटते की, तुमच्या प्रवास वर्णनामुळेच अमरनाथ यात्रा करण्याची इच्छा पूर्ण झाली.
संजय सूर्यवंशी
सर्व लेख आणि यात्रेकरूंच्या प्रतिक्रिया वाचून व मनोगत ऐकून खूपच छान वाटले .भाऊंचे ग्रुप मॅनेजमेंट, ग्रुप नेतृत्व धडाडीचे तसेच मन मिळाऊ व सर्वांना संघटन करणारे दिसले. भाऊ आपणास असेच भक्ती कार्य व समाज सेवा कार्य,देश सेवा घडत राहो व बाबा भोले नाथ व माता वैष्णवी देवी आपणास शक्ती तसेच दिर्घ आयुष्य प्रदान करो व असेच कार्य घडत राहो हेच त्यांच्या चरणी मागणे.पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा .
प्रविण बसवंते ,हनुमान पेठ
सामान्य नागरिक व भगिनींना विनंती आहे की,नांदेड जिल्ह्यातील एकमेव समाज सेवक दिलीपभाऊ ठाकूर यांच्या पुढील आयुष्यासाठी काळजी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.भाऊंना खुप खुप शुभेच्छा.
मीना कुलकर्णी
भाऊ,तुमचे १३ ही लेख वाचल्यानंतर मागच्या २१ वी अमरनाथ यात्रेची आठवणी जाग्या झाल्या. अमरनाथ यात्रा करावी तर भाऊ सोबतच.
ज्येष्ठ पत्रकार शेख शफी
सर मला पण आपल्या लेखमालेतून अमरनाथ यात्रा घरी बसून घडवली आहे.मी आपली पूर्ण लेखमाला वाचली असून असं वाटत होते की मी आपल्या सोबतच आहे .आपली अमरनाथ यात्रा सुखरूप पार पडल्यामुळे खूप खूप आनंद झाला धन्यवाद. आपण वाचनीय लेखन शैलीत केलेले वर्णन खूपच सुंदर आहे. आपण पत्रकार अथवा लेखक झाला असता तर आणखी जास्त लोकप्रिय झाला असता असे वाटते.असेच लिहित रहा.
रत्नाकर केसकर
लेख वाचताना २०२२ ला केलेला प्रवास डोळ्या समोरून सहज फिरतो.ठाकूरजी तूम्ही महान कार्य करत आहात, आमच्या शुभेच्छा.
गंगाधरराव पांडे
दिलीपभाऊ आपले नियोजन आणि व्यवस्थापन वाखाणण्या जोगे असते हे आपण सिद्ध केले आहे. २०१३ मध्ये तिकीट काढून सुधा येणे झाले नाही. पुन्हा योग आला तर नक्की येईन. पण लेख वाचून घरी राहून प्रत्यक्ष यात्रा केल्याचा अनुभव येतो. बाबा अमरनाथ आपणास दीर्घायुष्य देवो आणि अशीच सेवा आपणाकडून घडो हीच प्रार्थना. …..समाप्त