नवीन नांदेड| प्रथमच सिडको नवीन नांदेड कार्यालय येथे नागरीकांच्या विविध अडचणी व अनेक प्रलंबित प्रश्नी प्रभारी प्रशासक कपील राजपूत व प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली, यावेळी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सह नागरीक सहभागी झाले.


सिडको येथील समाधान शिबिराचे आयोजन सिडको मुख्य प्रशासक भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शना खाली सिडको नांदेड कार्यालयात दोन दिवसीय समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नागरिकांनी विविध प्रश्नासंबंधी प्रशासक यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. दि 26 व 27 सप्टेंबर या दोन दिवस शिबिर होत असून पहिल्या दिवशी पासून नागरिकांची कार्यालयात मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदविली, यात मूळ घर मालक यांच्या हस्तांतरण बाबत ,मोंढा प्रकल्प विकास कामे ,अभय योजना भूखंड व घर हस्तांतरण ,बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.



यावेळी प्रशासक कपिल राजपूत,महेश करमपुरी आर पी. कुरे,भूमापक गणेश शुक्ला, लिपिक विलास जोशी ,संकेत गिरी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रशासक कपिल राजपूत यांनी सांगितले की पहिल्या दिवशी दिवसभर राबविण्यात आलेल्या शिबिरास घरधारक ,भुखंड धारक व नागरिकांचा तक्रारी प्राप्त होऊन तात्काळ निवारण करण्यात आले. या शिबीरात चांगला प्रतिसाद मिळाला असून दुसऱ्या दिवशीही आयोजित नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी प्रशासक कपील राजपूत यांच्या वतीने करण्यात आले.




