हदगाव, शेख चांदपाशा| नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका झाल्या असुन, आता विधानसभेचे पडघम हदगाव विधानसभा क्षेञांत वाजु लागले आहे. स्थानिक बडे नेत्याकडे लाभाच्या पदासह अनेक पदे आहेत. ते बडे नेते विधानसभा निवडणूकीच्या कामाला लागा म्हणुन गोड बोलुन खाद्यावर हात ठेवून कार्यकर्त्यांच्या छोटासा जरी कार्यक्रम आसला तरी हजेरी लावतांना दिसुन येत आहेत. विशेष म्हणजे स्थानिय नेते मंडळी व इच्छुकांना विधानसभेच्या निवडणूकीच वेध लागले असतांना माञ त्याना कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचे ‘सोयरसुतक’ नाही का..? अश्या संतप्त प्रतिक्रिया राजकीय कार्यकर्ते याच्या मध्ये ऐकवायास मिळत आहे.
वास्तविक पाहता लोकसभेची निवडणूक संपताच जिल्हा परिषद, पचायत समिती, नगरपालिका ह्याच्या निवडणूका अपेक्षित होत्या. कारण या निवडणूकातुन कार्यकर्ते याना ‘एनर्जी ‘मिळत असते. मिनी मञालय ‘म्हणून ओळखल्या जाणा-या ह्या जि. प. प.स.स्थानिक स्वराज्य सस्था व नगरपंचायतीचा कार्यकाळ संपून दोन आडीच वर्षाचा काळ झालेला आहे. त्यामुळे सध्या प्रशासकराज असल्याने हदगाव शहर व तालुक्यात काही नेत्याचे संधीसाधू व चेलेचपाटे अप्रत्यक्षपणे अधिका-यावर राजकीय दबाव टाकून व दुस-याच्या नावे कञाटे घेवून नको त्या ठिकाणी रोड व इतर विकास कामे करून बोगस बीले काढण्याची धडपड करत आहेत.
बोगस कामे झालेली असताना देखील त्यांची देयके कशी दिली जातात यावरून नागरिकांना शंका व्यक्त करण्यास वाव मिळत आहे. प्रशासकीय राजमुळे ग्रामीण व शहरातील भागातील विकास कामांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रमुख समस्यांवर याचा परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडुन विधानसभेच्या तयारीला लागा म्हणून सुचना मिळत असल्याच कार्यकर्त्यांच म्हणने आहे. परंतु जि.प. प.स. व नगरपरिषद निवडणूका करिता हे लोकप्रतिनिधी सरकारकडे का..? आग्रह धरत नाही असा सुर कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकवायास मिळत आहे. हदगाव व हिमायनगर तालुक्यात गेल्या दोन ते आडीच वर्षापासुन निवडणूकी करिता तिकीट मिळणार म्हणून कार्यकर्ते ‘ गुडघ्याला बाशिंगे ‘बाधुन तयार आहेत.
जर त्या लोकप्रिय नेत्याच्या कार्यशैली बद्दल कोणी ‘ब्र ‘शब्द जरी काढला तर हे कार्यकर्ते सोशल मिडीयावर अत्यंत वाईट शब्दात ‘ट्रोल’ करून स्वतःच्या अंगावर विरोध ओढून घेत आहेत. त्यामुळे स्वयंघोषित भावी पंचायत समिती सदस्य, जि.प. सदस्य व नगरसेवक म्हणून स्वतः मिरवत आहेत. त्यामुळे शहर व ग्रामीण भागच्या नागरी व ग्रामीण भागात विकासाशी नाळ जुळलेल्या या विभागाच्या निवडणूका कधी..? होणार या बाबत किमान पावसाळी अधिवेशनात शेवटच्या सत्रात तरी राज्यातील आमदार हा प्रश्न मांडतील काय..? असा सवाल कार्यकर्ते म्हणाताना दिसुन येत आहेत.