नांदेड| विधानसभा निवडणुक आचारसंहिता काळात १) लोहा, २) उस्माननगर, ३) देगलुर, ४) इतवारा, ५) नांदेड आदी ग्रामीण पाच टोळीतील १३ इसमांना नांदेड जिल्हयाबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे.
विधानसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने आचार संहिता कालावधीत पोलीस ठाणे लोहा, उस्माननगर, देगलुर, इतवारा व नांदेड ग्रामीण यांचेकडुन कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये वर नमुद इसमांना हद्दपार करण्यासंबंधाने प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामध्ये कायदेशीर चौकशीची प्रक्रिया पुर्ण करुन अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी वर नमुद पाच टोळीतील १३ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर सहा महीण्याचे कालावधी करीता हद्दपार केले आहे तसे अंतिम आदेश पारीत करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्हयातील धोकादायक व्यक्तींना स्थानबध्द करण्यासंबंधाने चालु वर्षात २४ प्रस्ताव प्राप्त झाले असुन १२ व्यक्तींना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले आहे. सन २०२४ मध्ये कलम ५५ म. पो. का. अन्वये १२ टोळ्यामधील ३७ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले आहे तसेच कलम ५६ म. पो. का. अन्वये ०२ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर तडीपार करण्यात आले आहे. चालु वर्षात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये २१२ प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे.