नवीन नांदेड l सिडको येथील वात्सल्यनगर सहकारीगृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक भिवराज कलंत्री यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी एस.के. सरकटे यांनी केली.


दि २७ रोजी झालेल्या सभासदाच्या बैठकीत हि घोषणा करण्यात आली असून सिडको येथील वात्सल्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेची पंचवार्षीक निवडणुक घेण्यात आली.


या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून एस.के.सरकटे यांनी काम पाहिले,यात सर्व सभासद बिनविरोध निवडून आले असून यात सर्वसाधारण गटातुन विश्वनाथ हंगरगेकर ,दत्तात्रय गोडघासे, प्रदिप बिरादार, बळवंत तुप्पेकर, किरणकुमार धुत, डॉ.अशोक कलंत्री आनंद कोटगिरे तर सौ.सिंधुताई तिडके सौ.जयश्री कुलकर्णी ह्या महिला प्रवर्गातुन तर सौ.सपना कंदमवार -इतर मागासवर्गीय आणि सौ.सुशिलाबाई सोमवारे ह्या अनुसुचीत जाती जमाती प्रवर्गातुन विजयी झाल्याची माहीती दिली.

गेल्या दहा वर्षांचा कार्यकाळात सभासद बांधवांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन पुनश्च सभासद बांधवांनी तिसऱ्यादा डॉ.अशोक कलंत्री यांच्यी चेअरमन निवड झाल्याबद्दल मित्र मंडळ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
