नांदेड l प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रातील विद्युत महापारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेण काढायला लावता काय ? महापारेषणचे कार्यकारी संचालक यांचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा संतप्त सवाल अखिल भारतीय बहुजन समता परिषदेने उपस्थित केला आहे.


छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून म. गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत “सेवा पंधरवाडा” राबविण्यात येणार असल्याचे पत्रक महापारेषण कंपनीने तीन दिवस उशिरा म्हणजे दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी काढले (पत्र क्र. 8307). हे पत्रक मुंबईहून युनिट लेव्हल पर्यंत जाण्यासाठी पंधरा दिवस लागतील. म्हणजे याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही पण या पत्राला अखिल भारतीय बहुजन समता परिषदेने तीव्र हरकत घेतली आहे.
याबाबत अखिल भारतीय बहुजन समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी महापारेषण कंपनीच्या उपरोक्त पत्राची गंभीर दखल घेतली असून यातील मुद्दा क्र. 1 नुसार स्थानिक गोशालेत जाऊन स्वच्छता अभियान राबविणे व गायीना चारा वाटप करण्याचे निर्देश कंपनीने दिले आहेत.


महापारेषण कंपनीचे अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना गाईंचे शेण काढायला लावता काय ? यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नापिक डोके असून
कार्यकारी संचालक यांचे डोके ठिकाणावर आहे काय ? महाराष्ट्रातील जनता अतिवृष्टीमुळे परेशान असताना त्यांचे अश्रू पुसण्या ऐवजी गाईंचे गोठे साफ करुन शेण काढायला लावता काय ? असा संतप्त सवाल उपस्थित करुन इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी कार्यकारी संचालक (मास) यांचा जाहीर निषेध केला आहेत.


शाळेत स्वच्छता करणे, वृक्षारोपण व समस्या निवारण हे एक वेळ समजू शकतोत पण प्रत्यक्षात गोशालेत जाऊन शेण काढायला लावणे हे संघाच्या विचारांचे दडपण असून त्याचा आम्ही जाहिर निषेध करीत असल्याचे पत्रक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.



