नांदेड│महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जिल्हा अजिंक्यपद क्रॉसकंट्री (मुले/मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, ग्रामीण तंत्रनिकेतन समोर, पाईपलाईन रोड, विष्णुपुरी, नांदेड येथे होणार आहे.


या स्पर्धेत गुणानुक्रमात पात्र ठरणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्री चॅम्पियनशिप 2025-26 साठी संधी मिळणार असून राज्यस्तरीय स्पर्धा दि. 10 जानेवारी 2026 रोजी पी.ई.एस. कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडणार आहे. निवड समितीने आधीच निवडलेल्या खेळाडूंनाही यात पात्रता राहील.

जिल्ह्यातील शारीरिकदृष्ट्या सक्षम, इच्छुक खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे तसेच क्रीडा मार्गदर्शक शिवकांता देशमुख, शुद्धधन नरवाडे, ज्ञानेश्वर कोंडलांडे, वैभव अंभोरे, कांचन मस्के, संतोष आनेराव, शेख शब्बीर, गजानन फुलारी, लोपमुद्रा आनेराव, संतोष सोनसळे, सविता पतंगे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


वयोगट व जन्मतारखा (गटानुसार पात्रता)
• U-16 मुले/मुली — 25/01/2010 ते 24/01/2012
• U-18 मुले/मुली — 25/01/2008 ते 24/01/2010
• U-20 मुले/मुली — 25/01/2006 ते 24/01/2008
• खुला गट — वयाची अट नाही.14 वर्षांखालील खेळाडूंना सहभाग मान्य राहणार नाही.

स्पर्धेचे अंतर (वयोगटानुसार)
• खुला गट — 10 किमी
• U-20 : मुले 8 किमी │ मुली 6 किमी
• U-18 : मुले/मुली 4 किमी
• U-16 : मुले 2 किमी │ मुली 2 किमी
प्रवेश शुल्क व आवश्यक कागदपत्रे
• प्रवेश शुल्क — ₹150
• AFI UID अनिवार्य
• आधार कार्ड झेरॉक्स
• जन्मदाखला झेरॉक्स कागदपत्रांशिवाय राज्यस्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
या स्पर्धेत केवळ नांदेड जिल्ह्यातील खेळाडूंनाच पात्रता, स्पर्धेपूर्वी 1 तास ठिकाणी नोंदणी आवश्यक असून, अधिक माहितीसाठी संपर्क बंटी सोनसळे — 9096051532, विष्णू पूर्णे — 7588430145, वैभव दोमकोंडवार — 8623005600, साईनाथ — ७४२०८५२४२९ या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर सचिव प्रलोभ कुलकर्णी (9421819020 / 8625021219) यांनी केले आहे.

