नांदेड l डॉ. संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदखेड अंतर्गत पालाईगुडा (भोरड) येथे सेंटिनल सेंटर श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ यांच्या अहवालानुसार पालाईगुडा येथील रुग्ण स्क्रब टायफस (Scrub Typhus IGM Positive) यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी यवतमाळ यांनी कळविल्याले.


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख मॅडम यांनी सदरील रुग्णाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णाच्या घराच्या आजूबाजूच्या सर्व कुटुंबाचे रक्त नमुने (ब्लड सॅम्पल्स) घेण्याचे तसेच गावात कोरडा दिवस पाळण्याचे, स्वच्छता मोहीम राबविण्याचे, अबेटिंग करण्याचे तसेच धूर फवारणी, मालेथेन डस्टीग करण्याविषयी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती मोरे तसेच पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस.गावंडे यांना आदेशित केले.


असून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेले (अधिकारी/कर्मचारी) तालुका आरोग्य पर्यवेक्षक वैभव खाडे, अँटमॉलॉजिस्ट मुकेश सलाम,आरोग्य सहाय्यक एस. व्ही.गावंडे,लेप्रसी पर्यवेक्षक के. बी.जाधव,आरोग्य कर्मचारी श्रीमती जे.डी.हिवाळे,आरोग्य कर्मचारी गजानन जेवलेवाढ, नागेश मडावी तसेच आशा वर्कर श्रीमती सीमाताई पवार उपस्थित होते इत्यादी.




