नांदेड| आकाशवाणी नांदेड केंद्रावर शनिवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 40 मिनिटानी नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची स्टॉप डायरिया अभियान आणि जलजन्य आजार व उपाययोजना याविषयी मुलाखत प्रसारित होणार आहे. मिलिंद व्यवहारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत त्यांनी “स्टॉप डायरिया अभियान” आणि जलजन्य आजार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. देशमुख यांनी जलजन्य आजार, त्यांची कारणे, आणि त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. यासोबतच, ग्रामपंचायतींची जबाबदारी आणि या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कोणत्या उपाययोजना राबवायला हव्यात, याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली आहे.
तसेच, डॉ. देशमुख यांनी नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना, स्वच्छता पाळण्याचे महत्त्व, आणि रोगांचे निदान आणि उपचार याबाबतही महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. तरी श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन, नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी तथा कार्यालय प्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.