नांदेड, माणिक भिसे| पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२४ या स्पर्धेचे आयोजन जि. प. शिक्षण विभाग (माध्यमिक) यांनी कन्या प्रशाला परभणी येथे केले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा फुलकळस या शाळेच्या ‘जल है तो जीवन है’ या विज्ञान नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला.
या विज्ञान नाट्याचे लेखन व दिग्दर्शन डॉ. सिद्धार्थ मस्के यांनी केले. या नाटीकेत प्रमुख भुमीकेत सत्यम शिराळे, समर्थ स्वामी, साईराज गव्हाळे, तनिष्का मोगरे, संध्या शिंदे, स्नेहल मिसाळ, मयुरी कुबडे, वैष्णवी पुरी ह्या विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेच्या विज्ञान शिक्षका अंजली रिंगणे यांनी केले. जिल्ह्यातून ही विज्ञान नाटीका विभागस्तरीय विज्ञान नाट्योत्सवासाठी पात्र ठरली आहे.
या शाळेच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद शिराळे, मुख्याध्यापक दयानंद स्वामी, महेश लोहोकरे, रुख्माकांत लेंडाळे, प्रशांत टाक, तानाजी कळसाईतकर, आनंद घंटेवाड. ललीता सावळे आदींनी अभिनंदन केले आहे. या शाळेस जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२४ चे प्रशस्तिपत्र गोविंद मोरे – विज्ञान पर्यवेक्षक ,शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.परभणी व आशा गरूड -शिक्षणाधिकारी माध्यमिक परभणी यांच्या स्वाक्षरीने नाटिकेतील विध्यार्थी व शिक्षक यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.