Departmental Science Drama : फुलकळस येथील जि .प.केंद्रीय प्राथमिक शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सासाठी निवड -NNL
नांदेड, माणिक भिसे| पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२४ या स्पर्धेचे आयोजन जि. प. शिक्षण विभाग (माध्यमिक) यांनी कन्या प्रशाला परभणी येथे केले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा फुलकळस या शाळेच्या 'जल है तो जीवन है' या विज्ञान नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला.
या विज्ञान नाट्याचे लेखन व दिग्दर्शन डॉ. सिद्धार्थ मस्के यांनी केले. या नाटीकेत प्रमुख भुमीकेत सत्यम शिराळे, समर्थ स्वामी, साईराज गव्हाळे, तनिष्का मोगरे, संध्या शिंदे, स्नेहल मिसाळ, मयुरी कुबडे, वैष्णवी पुरी ह्या विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेच्या विज्ञान शिक्षका अंजली रिंगणे यांनी केले. जिल्ह्यातून ही विज्ञा...
