नांदेड। स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशात सर्वात मोठी बँक म्हणून गणल्या जाते. ग्राहकांची विश्वासार्हता जपत बँकेने ग्राहकांना अनेक सेवांचा लाभ देते. इतर सेवा देण्याबरोबरच सामाजिक जाणीवेतून सामाजिक दायित्व बँक पार पाडत असते.


याचाच एक भाग म्हणून बँकेने दिनांक 27 जून रोजी शिवाजीनगर नांदेड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वसरणी येथील दिव्यांग शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्याना सात व्हीलचेअरचे वाटप केले. तसेच लातूर येथील दिव्यांग संस्थेच्या दिव्यांगांना ये -जा करण्यासाठी मिनी बसचे वितरण केले.


तसेच नांदेडच्या महानगरपालिकेच्या 16 शाळांना वॉटर कुलर चे वितरण बँकेचेमहाराष्ट्र सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक श्री अरविंद कुमारसिंग .महाव्यवस्थापक अनिरुद्ध कुमार चौधरी .नांदेड विभागीय कार्यालयाचे उप महा व्यवस्थापक प्रिया कुमार सरिगला आणि नांदेड क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक श्री पक्काला कालिदासू आणि लातूर क्षत्रिय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक श्री अमर सिंग यांचे हस्ते वितरण करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता पोरडवार यांनी केले .या कार्यक्रमासाठी मुख्य प्रबंधक शशिकांत फरकाड़े, नांदेड मुख्य शाखेचे, मुख्य प्रबंधक श्री सतीश राऊत ,मा. स .प्रबंधक मनोज कुमार साहू, हर्ष कुमार नायकेलकर यांच्यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थितीत उपस्थित होते.



