स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे गरजूंना मिनीबस ,व्हीलचेअर, आणि वॉटर कुलरचे वितरण -NNL
नांदेड। स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशात सर्वात मोठी बँक म्हणून गणल्या जाते. ग्राहकांची विश्वासार्हता जपत बँकेने ग्राहकांना अनेक सेवांचा लाभ देते. इतर सेवा देण्याबरोबरच सामाजिक जाणीवेतून सामाजिक दायित्व बँक पार पाडत असते.
याचाच एक भाग म्हणून बँकेने दिनांक 27 जून रोजी शिवाजीनगर नांदेड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वसरणी येथील दिव्यांग शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्याना सात व्हीलचेअरचे वाटप केले. तसेच लातूर येथील दिव्यांग संस्थेच्या दिव्यांगांना ये -जा करण्यासाठी मिनी बसचे वितरण केले.
तसेच नांदेडच्या महानगरपालिकेच्या 16 शाळांना वॉटर कुलर चे वितरण बँकेचेमहाराष्ट्र सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक श्री अरविंद कुमारसिंग .महाव्यवस्थापक अनिरुद्ध कुमार चौधरी .नांदेड विभागीय कार्यालयाचे उप महा व्यवस्थापक प्रिया कुमार सरिगला आणि नांदेड क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक श्र...
