नवीन नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको परिसरात काढण्यात आलेल्या विविध शाळेतील प्रभातफेरी मधील विधार्थी यांना शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको परिसरातील राज कॉर्नर परिसरातील भागात नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष शेख असलम यांच्या मार्गदर्शनाखाली शेख मुकरम, शेख युनूस, ईम्रानखान, आकाश कदम, शेख निजाम, शेख ऊसमान खान, दिनेश मिरासे, आकाश राऊत, शिवम घोरबांड, मोईनखान, अनिकेत राक्षसमारे,वैभव धोत्रे,शेख सिकंदर, तफरोज पठाण, यांच्या सह मित्र मंडळ यांनी खाऊचे वाटप केले. यावेळी माजी नगरसेविका डॉ. करूणा जमदाडे यांनी भेट देऊन ऊपकमाचे स्वागत केले. वसरणी येथील निवासी अंध विघालय, धनेगाव येथील अंध विघालय येथे फळे व खाऊचे वाटप करण्यात आले.

