नांदेडलातूरसोशल वर्क

Hivatap : सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर

नांदेड| लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत डी.वडगावे साहेब रुजू झाल्या बदल नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्यजीत टिप्रेसवार जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोषाध्यक्ष हिवताप कर्मचारी संघटना (मा. बाजीराव कांबळे साहेब) यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नांदेड जिल्ह्यातील हिवताप, हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या बाबत चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले. आश्वासित प्रगती योजना (10,20 व 30 वर्ष) लाभ देय बाबत येत्या आठ दिवसात विभागीय समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे व बैठक होताच काही दिवसात आदेश निर्गमित करण्यात येतील.

आरोग्य कर्मचारी यांची दि.1.1.2025 रोजीची विभागीय जेष्ठता सूचि अद्याप पर्यंत प्रसिद्ध करण्यात आली नाही ती पण लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, आरोग्य कर्मचारी संवर्गातून आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती, क्षेत्र कर्मचारीतून आरोग्य कर्मचारी पदी पदोन्नती करण्यात यावी या बाबत माहिती मागवून लवकरच पदोन्नती करण्यात येतील असे मा.डॉ हणमंत वडगावे साहेब सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर यांनी सांगितले. यावेळी राहुल जाधव सहाय्यक अधिक्षक, श्रीमती शेटकार मॅडम होते.

मा.डॉ.अमृत चव्हाण सर जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, कैलास सावळे कार्यालयीन अधिक्षक, अशोक हरनाळीकर वरिष्ठ लिपिक, दिलिप राठोड लिपिक, मुकुंद देवकांबळे जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड आदी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

One Comment

  1. साळवे नी 2023आरोग विभाग जाहातीत गोंधळ घालून 11 पात्र उमेदवारांच भविष्य खराब केलं… अशा अधिकार्यांचे निलंबन झाले पाहिजे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button