नवीन नांदेड। श्रावण मास निमित्ताने संयोजक संतोष कांचनगिरे यांच्या वतीने सिडको शिवलिगेश्वर मंदिर ते श्री काळेश्वर विष्णुपूरी येथे १८ आगस्ट रोजी काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत माजी मुख्य पुजारी पिंटू महाराज ,सनमुख महाराज यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करून काढण्यात आली.


यावेळी पदयात्रा मार्गावर पदयात्रेत सहभागी भाविक भक्तांसाठी किशनराव येवते व गजानन आयलवाड यांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होते, हर हर महादेव, काळेश्वर भगवान कि जय यासह घोषणांनी परिसर दणाणून गेला या पदयात्रेत महिला सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री शिवलिंगेश्वर मंदिर, सिडको, नांदेड ते श्री काळेश्वर मंदिर, विष्णुपूरी येथे दि.१८ आगस्ट २४ रोज रविवारी सकाळी ११ वाजता भव्य पदयात्रा शिवलिगेश्वर मंदिरात महादेव पुजन व महाआरती करून या पदयात्रेस विनोद माधवराव कांचनगिरे,डॉ.गजेंद्र संतुकराव देशपांडे ॲड. समिर सुरेंद्रराव पाटील सौ.प्रा.डॉ. ललीताबाई शिंदे (बोकारे) डॉ. नरेश रायेवार , यांच्यी विशेष उपस्थिती राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून सौ.विजयाताई गोडघासे,नवनाथ कांबळे,सुदर्शन कांचनगिरे, डॉ.अशोक कलंत्री, पंढरीनाथ मोटरगे,भुजंग स्वामी, किशनराव येवते, पांडूरंग सोनवळे आप्पा,व पत्रकार रमेश ठाकूर,सारंग नेरलकर यांच्या सह मान्यवर उपस्थिती होती.


प्रारंभी महाआरती व विधीवत पुजन व श्रीफळ फोडून ढोल ताशांच्या गजरात या पदयात्रेला सुरूवात झाली, क्रांती चौक, संभाजी चौक लातूर फाटा मार्ग विष्णुपूरी मार्ग काळेश्वर मंदिर येथे गेली. यावेळी सहभागी भक्तांनी दर्शन व महाप्रसाद लाभ घेतला, यावेळी पदयात्रा मार्गावर लातूर फाटा मार्गावर किशनराव येवते, गजानन आयलवाड यांच्या वतीने फराळ व केळी वाटप करण्यात आली , आयोजक संतोष माधवराव कांचनगिरे यांनी परिश्रम घेतले.



