नवी दिल्ली| देशात अनेक विवाह नोंदणी वेबसाईट वरून अविवाहित आणि विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या संबंधितांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी विवाह नोंदणी वेबसाईट केंद्र सरकारने नियंत्रित कराव्यात अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली आहे.


देशातील विविध भागात विविध भाषेत विवाह नोंदणी वेबसाईट मोठ्या प्रमाणात चालविल्या जातात. यामधून अविवाहित मुला मुलींसाठी स्थळ शोधून दिली जातात. परीतक्त्या , विधवा , विधुर यांच्यासाठीही विवाह जुळवून देण्यासाठी या वेबसाईटवरून अनेक अमिष आणि प्रलोभन दाखविले जातात . त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो . अशातच छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका व्यक्तीने देशभरातील तब्बल 500 नागरिकांना फसवल्याचा प्रकार नुकताच पुढे आला आहे. त्याने वेगवेगळ्या सहा वेबसाईट तयार करून विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या मुलामुलींकडून आणि संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळी आहे. यातून अनेकांची फसवणूक केली आहे .

असाच प्रकार पुणे पोलिसांनी उघड केला असून पुण्यातील एका महिलेला जम्मू-काश्मीरमधील एका व्यक्तीने फसवून तिच्यावर तिचे लैंगिक शोषण केले आहे . याप्रकरणी पुणे पोलिसांमध्ये संबंधित ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनियंत्रित असलेल्या विवाह नोंदणी वेबसाईटला नियंत्रित करण्याची मोठी गरज आहे. अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने अनियंत्रित विवाह वेबसाईटवरून चिंता व्यक्त केली अस केली असून अशा वेबसाईट नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे.


यासाठी नवीन नियमावली तयार करावी असे निर्देशही दिलेले आहेत. या सर्व बाबींना लक्षात घेता आगामी काळात कोणत्याही नागरिकांची फसवणूक होऊ नये . अविवाहितांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी केंद्र सरकारने अशा सर्व विवाह नोंदणी वेबसाईट संस्था नियंत्रित कराव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केली आहे.


