नवीन नांदेड| राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली धनेगाव – मुजामपेठ जोडणारा पुलासाठी १९८ कोटीचा प्रस्ताव , गावातील सांडपाण्याचे निचरा होण्यासाठी नालीची उंची कमी करावी . चारगांवची पाणिपुरवठा लाईनचे स्थंलातर , यासह अनेक कामे प्रलंबित असुन सुध्दा राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या गुत्तेदार आणि प्रशासना कडुन अडमुठे धोरण राबवत आहेत, प्रलंबित कामे आगोदर करावे अशी मागणी धनेगाव – मुझामपेठ येथील नागरिकांनी या कामाला विरोध केला . यावेळी माजी आ मोहनराव हंबर्डे , माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे ,सरपंच गगाधर शिंदे यांनी वरिष्ठांशी संपर्क करत ह्या कामाला स्थगिती मिळुन दिली.
राष्ट्रीय महामार्ग ३६१ ह्या महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे . या महामार्गाच्या एका बाजुला धनेगाव – मुजामपेठ ग्रामपंचायत, तर दुसऱ्या बाजुला येथील ग्रामस्थाची शेती ,नांदेड शहराला जोडणारा रस्ता ,विद्यार्थांना , नागरिकांना दुसऱ्या बाजुला जाण्यासाठी दोन किलो मिटरचे अंतर कापत शेतीचे ,शहराचे काम करण्यासाठी जावे लागेल यासाठी ग्रामस्थांनी हे अतंर कमी व्हावे. यासाठी या महामार्गावर धनेगाव – मुजामपेठला जोडणारा पुल करण्याची मागणी ग्रामस्थाच्यावतीने केली होती ,या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी आणि ग्रामस्थाच्या झालेल्या बैठकीत हा पुल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला .
त्यासाठी लगाणाऱ्या खर्चाचे नियोजन करत १९८ कोटी रुपयाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आला . या प्रस्तावाला रस्ते बांधकाम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने या पुलासाठी सकारात्मक भुमिका घेतली होती. या प्रस्तावासाठी माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण , माजी आ मोहनराव हंबर्डे, माजी आ.अमरनाथ राजुरकर यांनी पाठपुरवा केला होता. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग तयार करणारे गुत्तेदार यांच्याकडे पुल करण्याची मागणी केली होती . त्यानुसार त्या मागणीची दखल घेत कामे करण्याचे आश्वासन गुत्तेदाराने ग्रामस्थाना दिले होते .
यात चारगांवाची पाणिपुरवठा लाईनचे स्थंलातर ,मुझामपेठला होणाऱ्या पाणिपुरवठा लाईनची दुरुस्ती , धनेगाव व परिसरातील सांडपाणी वाहुन जाण्यासाठी नालीची उंची कमी करणे यासह अनेक कामे या निवेदनाद्वारे मागणी केली होती ,परंतु या राष्ट्रीय महामार्गाच्या गुत्तेदारांनी या मागण्याकडे दुर्लक्ष करत कामे करत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थानी अगोदर प्रलंबित मागण्या त्वरीत करावे अशी भुमिका घेतली .
यावेळी नांदेड दक्षिणचे माजी आ. मोहनराव हंबर्डे , माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे ,धनेगाव ग्रामपंचायत सरपंच गंगाधर शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आ.अमर राजूरकर यांच्याशी तर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करत या कामाला स्थगिती मिळवुन दिली, त्यामुळे काही वेळ या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब महाराज, गंगाधर कवाळे, ग्रामपंचायत सदस्य तातेराव ढवळे, अब्दुल गफुर, रमेश वाघमारे,राजु बोटलावार,शंकर शिंदे, नेहरकर, रणविरकर, गंगाधर कवाळे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते तर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर कदम,जि.एन.भालेराव,मधुकर शिंदे,व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.