देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील शहापूर येथील आयडीबिआय बँकेत पिक कर्ज, सोनं तारण कर्ज तसेच व्यवसाय कर्ज उपलब्ध करून न देता आज उद्या चाल ढकल केली जात असून, येथील बँक अवघड जागेच दुखन होवून बसली असून, बैंक अडचन नसुन खोळंबा अशी अवस्था शेतकरी व गावकऱ्यांची झाल्याने बँकेच्या भोंगळ कारभारामुळे जनता, शेतकरी वर्गातून बैंकेच्या वागणुकी बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुजोर अकार्यक्षम बँक व्यवस्थापक चोधरी हे शहापूर येथील पदभार स्वीकारला पासून आजपर्यंत बँकेला हेलपाटे मारल्या शिवाय कर्ज उपलब्ध करून दित नाहीत. आजघडीला जनता शेतकरी कर्जाची मागणी करुन बँकेने कर्ज तर वेळेवर देणे सोडा शेतकरी सोने तारण ठेवून कर्ज देखील लवकर उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे सांगत आहेत. येथील शेतकऱ्यांची कहाणी बाप भीक मागू देईना माय जेवू घालना अशी झाली आहे.
तसेच बैंक खाते आधार लिंक करणे खाते उघडणे यासाठी जनतेला ताटकळत बसावे लागते असून, शेतकऱ्यांना बँकेला हेलपाटे मारावे लागतात. बँक व्यवस्थापकाच्या आडमुठ्या धोरण भोंगळ कारभारामुळे शहापूर येथील भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी कनकटे यांनी संभाजीनगर येथील वरिष्ठांना लेखी निवेदन देऊन देखील इंचभर फरक पडला नाही.
तेव्हा जनतेने दाद मागावी तरी कोणाकडे..? असा सवाल शेतकऱ्यांना पडतो आहे. वरिष्ठ अश्या मुजोर अधिकाऱ्यांना कशासाठी पाठीशी घालत आहेत हे जनतेला न उलगडणारे कोडे आहे. वरिष्ठांशी साटेलोटे असल्यानेच या बैंक अधिकारी याचा लाड पुरवत वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांना समजूत काढले जाईल अशी उतरे मिळतातं.
आतातरी शेतकरी संकटात असताना वरिष्ठांनी यांची दखल घेऊन संभाजीनगर व शहापूर येथील आय.डी.बि.आय. चे मूजोर व अकार्यक्षम बँक व्यवस्थापकाची उचलबांगडी करावी. अशी जनतेतुन मागणी होत असुन, उचलबांगडी न झाल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागाणार असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे.