नांदेड| महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भिक्खू संघाला चिवरदान करण्यात आले. तसेच भिक्खू संघाकडून त्यांना बुद्ध मूर्ती भेट देण्यात आली.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत बोधिपालो महाथेरो, अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पंयाबोधी थेरो, भदंत पय्यानंद थेरो, भदंत नागसेनबोधी थेरो, भदंत सत्यपाल थेरो, भदंत करुणानंद थेरो, भदंत महाविरो, भदंत धम्मशील थेरो आदी भिक्खू संघ उपस्थित होता. उदगीर (जि. लातूर) येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)