नांदेड| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान विविध धार्मिक व शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून दुपारी 12.35 वाजता विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 1.35 वाजता त्यांचे श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन होईल.

यानंतर दुपारी 2 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगमनाप्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2.05 वाजता मोटारीने ते तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिबजी, नांदेड येथे रवाना होतील. दुपारी 2.15 वाजता गुरुद्वारात आगमन होईल.


दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री मोटारीने मोदी मैदान, वाघाळा, नांदेड येथे प्रयाण करतील. दुपारी 3.10 वाजता तेथे आगमन होईल. येथे आयोजित “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वा शहीदी वर्ष व श्री गुरु गोबिंद सिंघजी 350 वा गुरता गद्दी शताब्दी समागम कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी 4.30 वाजता मुख्यमंत्री मोटारीने पुन्हा श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ, नांदेड कडे रवाना होतील. दुपारी 4.40 वाजता विमानतळावर आगमनानंतर 4.45 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रस्थानप्रसंगी उपस्थिती राहील. त्यानंतर सायंकाळी 4.55 वाजता मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

