नांदेड | नांदेड शहरात मामा चौक, मैदान जुना कौठा, नांदेड येथे 23 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये पंडीत प्रदिप मिश्रा (सिहोरवाले) यांचे उपस्थितीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जिल्ह्यातील व परिसरातील भाविक मोठया प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कालावधीत शहरात व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना व इतर रहदारीस अडथळा होणार नाही यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये 23 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यत सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यत वाहतुकीच्या नियमाबाबत पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे.
शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठी बाहेरुन येणारे वाहतुकीस बंद असलेले मार्ग
कथा कार्यक्रमासाठी परभणी-वसमत-पुर्णाकडून येणारी वाहतुक छत्रपती चौक-तरोडा नाका-राज कॉर्नर-वर्कशॉप ते वजिराबाद चौकाकडे येणारी वाहतुक बंद राहील. कथा कार्यक्रमासाठी अर्धापूरकडून येणारी वाहतुक शंकरराव चव्हाण चौक-नमस्कार चौक-महाराणा प्रताप पुतळा ते शहरात येणारी वाहतुक पूर्णपणे बंद राहील. कथा कार्यक्रमासाठी लिंबगाव कडून येणारी वाहतुक ही वाघी रोड-पोलीस मुख्यालय- तिरंगा चौक-गोवर्धन घाट पुल मार्गे जाणारी वाहतुक बंद राहील.
शिवमहापुराण कथा कार्यक्रमस्थळाकडे जाण्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
कथा कार्यक्रमासाठी परभणी-वसमत-पुर्णाकडून येणारी वाहतूक ही छत्रपती चौक-मोर चौक-पिवळी बिल्डिंग-खडकपुरा अंडरब्रिज-वाघी रोड-हस्सापुर ब्रिज ते कार्यक्रमाचे पार्किंगचे ठिकाण. कथा कार्यक्रमासाठी अर्धापूरकडून येणारी वाहतूक आसना पुल ओव्हर ब्रिज-धनेगाव चौक-दुधडेअरी-आंबेडकर चौक-बसवेश्वर चौक- मामाचौक ते पार्कीगचे ठिकाण. कथा कार्यक्रमासाठी लिंबगावकडून येणारी वाहतूक ही वाघी रोड-हस्सापुर ब्रिज ते कार्यक्रमाचे पार्किंगचे ठिकाण. कथा कार्यक्रमासाठी नायगावकडून येणारी वाहतूक ही धनेगाव चौक-दुध डेअरी-आंबेडकर चौक-बसवेश्वर चौक-मामा चौक ते पार्कीगचे ठिकाणी याप्रमाणे राहील.
शिवपुराण कथेस परभणी, वसमत, पुर्णा, लिंबगाव, अर्धापूर, नायगांव, मुदखेड मार्गे येणारे भाविकांना वरील दिलेल्या पर्यायी मार्गाचा येण्या-जाण्यासाठी वापर करावा. 23 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यत दररोज 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीस अडथळा होवू नये यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.