traffic routes ; शहरातील वाहतुक मार्गात बदल – NNL
नांदेड | नांदेड शहरात मामा चौक, मैदान जुना कौठा, नांदेड येथे 23 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये पंडीत प्रदिप मिश्रा (सिहोरवाले) यांचे उपस्थितीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जिल्ह्यातील व परिसरातील भाविक मोठया प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कालावधीत शहरात व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना व इतर रहदारीस अडथळा होणार नाही यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये 23 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यत सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यत वाहतुकीच्या नियमाबाबत पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे.
शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठी बाहेरुन येणारे वाहतुकीस बंद असलेले मार्ग
कथा कार्यक्रमासाठी परभणी-वसमत-पुर्ण...
