नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १९ मधील जुना कौठा गावात जिल्हा नियोजन समितीच्या दलितेतर वस्त्या सुधारणा योजना विकास निधी अंतर्गत नाली बांधकाम, सिमेंट काँक्रीट व पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ २३ सप्टेंबर रोजी शिवसेना ऊबाठा गटाचे निष्ठावंत शिवसैनिक निळकंठ पाटील व छावा प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटीलयांच्या हस्ते करण्यात आले.
जुना कौठा गावात गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही निधी न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते छावाचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांनी सततच्या केलेल्या पाठपुरावा मुळे जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी उपलब्ध झाला आहे, या निधी अंतर्गत जिल्हा परिषद शाळा हनुमान मंदिर परिसर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भागात सिमेंट काँक्रीट रस्ता,नाली बांधकाम,पेव्हर ब्लॉक या कामामुळे परिसरात सौदर्य मध्ये भर पडणार आहे.
या कामाचा शुभारंभ २३ सप्टेंबर रोजी करण्यात आला. यावेळी सुभाष कोल्हे, दशरथ कपाटे, बालाजी गोरे, टोपाजी काकडे, प्रल्हाद काकडे, शिवाजीराव काळे, व जिल्हा परिषद शाळा कौठा शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.