Wednesday, May 27

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

cloudburst in Telangana ; तेलंगवाडी येथे ढगफुटीमुळे राजू बास्टे यांच्या शेतातील लाखो रुपयांचे नुकसान

cloudburst in Telangana ; तेलंगवाडी येथे ढगफुटीमुळे राजू बास्टे यांच्या शेतातील लाखो रुपयांचे नुकसान

कृषी, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l येथून जवळच असलेल्या मौजे तेलंगवाडी ता.कंधार येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीत शेतातील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दिनांक 29 ऑगस्ट रोजी शुक्रवार दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढग फुटी दृश्य मुसळधार पावसाने दाणादाण उडविली होती. तेलंगवाडी ता.कंधार येथील शेतकऱ्यांचे गट क्रमांक 300 मध्ये सौर ऊर्जा पॅनल , कृषी पंप , ( SPAN PUMP , COMPANY )चे ५ एच पी. मोटार , व संपूर्ण सौर उर्जा वाहून गेले . याचबरोबर शेतातील खरीप पिक खरडून गेले असून कडक शेतात दिसत आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सर्वाधिक नोंद कंधार लोहा मतदारसंघात झाली दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा घातला होता पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्हाचे पालकमंत्री अतुल सावे व आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकसान ग्रस्त गावांना भेटी देऊन पूर प...
Ganesh idols : ऍड दिलीप ठाकूर यांच्याकडे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह

Ganesh idols : ऍड दिलीप ठाकूर यांच्याकडे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह

नांदेड, धार्मिक
नांदेड| नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या नांदेड एस.टी. कर्मचारी गणेश मंडळाला सलग ३६ वर्षांपासून गणेशमूर्ती देण्याची अनोखी परंपरा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी जपली आहे. त्यांच्या निवासस्थानी आज सुमारे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह उभा राहिला आहे. क्रिकेट खेळणाऱ्या गणपतीपासून, ट्रॅव्हल बॅग घेऊन प्रवासाला निघालेल्या गणपतीपर्यंत आणि मोबाईल-लॅपटॉप हाताळणाऱ्या आधुनिक गणरायापर्यंतची विविध रूपे या संग्रहात पाहावयास मिळतात. दगड, टेराकोटा, तांबे, पितळ, फायबर, संगमरवर, बोनचायना, ब्राँझ, चंदनाचे लाकूड, रुद्राक्ष, सुपारी, नारळ, अगदी दोरी यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांतून तयार झालेल्या या मूर्ती पाहणाऱ्याला थक्क करतात. नटराज गणेश, विष्णुरूपी गणेश, हनुमानरूपी गणेश, कृष्णरूपी गणेश, रथारूढ, शेषारूढ, बटुवेशातील गणराय, वाद्यवृंदरूपी, दशावतारी, भरतनाट्यममुद्रा, स...
Kandahar : कंधार उपविभागातील महसूल अधिकारी व यंत्रणेची सतर्कता

Kandahar : कंधार उपविभागातील महसूल अधिकारी व यंत्रणेची सतर्कता

नांदेड, लाइफस्टाइल
कंधार तालुक्यात ६० हजार तर लोहा तालुक्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित पंचनामे करण्यासाठी ३२०हुन अधिक कर्मचारी लोहा-१२० तर कंधार मध्ये १७१ जनावरे दगावली लोहा| लोहा -कंधार तालुक्यात दोन दिवस (२८ व २९ ) झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या महापुरामुळे यानेक गावांना फटाका बसला. काही ठिकाणी तलाव फुटलती. शेतीपिकांचे नुकसान तर झालेच पण रहिवाशी भागात अभूतपूर्व विदारक परिस्थिती उदभवली,असा नैसर्गिक आपत्ती काळात कंधार उपविभागीय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे लोहा तहसीलदार ,विठ्ठल परळीकर ,लोहा मुख्याधिकारी श्रीकांत गोरे, कंधार मुख्याधिकारी,डीवायएसपी अश्विनी जगताप ,तसेच त्यांच्या टीमने दाखविलेली तत्परता अनेकांना जीवदान देणारे ठरले. मध्यरात्री पुरग्रस्त गावात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करत अनेकांचे प्राण वाचविले. स्थलांतर आणि पुरग्रस्त भागात तातडीची भोजन व्यवस्था केली आई उघडीप होताच तात्काळ पंचनामे सुरू ...
Bapurao Rathod : बंजारा समाजास एकत्र करणे ही काळाची गरज – बापूराव राठोड

Bapurao Rathod : बंजारा समाजास एकत्र करणे ही काळाची गरज – बापूराव राठोड

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
धाराशिव| ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही संघटना 1953 मध्ये वसंतराव नाईक साहेबांनी स्थापन केले असून, बंजारा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तेव्हापासून ते आज पर्यंत या संघटनेच्या अनेक लोकांनी काम केलेलं आहे. त्याच संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी बापूराव राठोड यांची निवड झाल्याबद्दल व त्याचबरोबर समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी धाराशिव जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बापूराव राठोड यांनी समाजाचे संघटन उभे करून एकत्रित समाजाच्या प्रश्नासाठी लढा उभा करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या बैठकीस यांच्यासोबत संभाजीनगरचे वित्त लेखा अधिकारी उत्तम चव्हाण, लातूर मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, भाजपा शहर उपाध्यक्ष एड. नितीन राठोड,सुनिल नायक,प्रा. प्रकाश राठोड, डॉ. विलास राठोड, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन धाराशिव जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजातर्फे करण्या...
Dr. Sunil Jadhav : डॉ. सुनील जाधव यांना इंडोनेशियामध्ये दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

Dr. Sunil Jadhav : डॉ. सुनील जाधव यांना इंडोनेशियामध्ये दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

नांदेड, करियर
बाली/नांदेड। इंडोनेशियातील बाली येथे नुकतेच २३ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित २५ वे आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलन हे हिंदी साहित्य आणि भारतीय संस्कृतीचा एक भव्य महाकुंभ ठरले. या आयोजनात भारतभरातून आलेल्या अनेक विद्वान आणि साहित्यिकांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप दिले. या संमेलनात, यशवंत महाविद्यालयाच्या हिंदी विभागात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेले डॉ. सुनील गुलाबसिंग जाधव यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील विशेष योगदानासाठी त्यांच्या ‘शोध ऋतु’ या बहुभाषी शोधपत्रिके करिता त्यांना 'ट्रू मीडिया गौरव सन्मान-२०२५' आणि त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी 'डॉ. शरद पगारे स्मृती सन्मान' प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळा आणि पुस्तकाचे प्रकाशन ट्रू मीडिया गौरव सन्मान-२०२५ त्यां...
District Collector Rahul Kardile : डिजेमुक्त पर्यावरणपूरक उत्सव साजरे करून नांदेडची नवी ओळख निर्माण करू या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : डिजेमुक्त पर्यावरणपूरक उत्सव साजरे करून नांदेडची नवी ओळख निर्माण करू या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात श्री गणेशोत्सव उत्सवात शांततेने आनंदाने साजरा करतांना तो पर्यावरणपूरक डिजेमुक्त म्हणून आपण साजरा करत आहोत. या उपक्रमातून नांदेड जिल्ह्याची चांगली नवी ओळख निर्माण करू या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्ह्यात श्री गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध गणेश मंडळाचा सत्कार सोहळा जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील जवळपास 250 गणेश मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासह विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आदींची उपस्थिती होती. सण उत्सव आनं...
Formal mla madhavrao patil jawalgaonkar : हदगाव–हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर

Formal mla madhavrao patil jawalgaonkar : हदगाव–हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर

नांदेड, राजकीय
नांदेड / हिमायतनगर अनिल मादसवार| गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस आणि नद्यांच्या पुरामुळे हदगाव–हिमायतनगर तालुका जलमय झाला आहे. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने पैनगंगा, कयाधू, कामारी-लाखाडी नद्या तसेच सर्व नाले तुडुंब भरून शेतात व घरांमध्ये पाणी शिरले. शेतकरी बांधवांचे गुरे-ढोरे, शेतीसाठी लागणारे साहित्य, सिंचन साधने पुरात वाहून गेले. शेतातील सर्व पिके नष्ट झाली असून, रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. शहरातील दुकाने पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...
Sarathi : मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

Sarathi : मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

नांदेड, मुंबई, लेख
राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक,आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा,कुणबी,मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 2019 पासून ‘सारथी’ ही संस्था सुरू केली आहे.मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था म्हणून ‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ या बोधवाक्याखाली छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था शिक्षण,मार्गदर्शन, कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता, संशोधन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या सर्व क्षेत्रांत 63 विविध उपक्रम राबवत आहे. सारथी संस्थेमधील सन 2021-22 ते 2024-25 एकूण चार वर्षांमध्ये 8 लाख 38हजार 477 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला असून अनेक विद्यार्थी या संस्थेमार्फत...
मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

नांदेड, महाराष्ट्र, लेख
मराठवाड्यातील नांदेड ,लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यात मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील 130 मंडळात येणार्‍या जवळपास 2550 गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला. वार्षिक सरासरी 679 मि.मी.च्या तुलनेत विभागात 573 मि. मी. म्हणजेच 84% पाऊस झाल्याची नोंद आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांची पूर्ण नासाडी झाली. एवढेच नव्हे तर शहरी भागात असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त नागरिक ,शेतकरी व व्यापारी राज्य शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यात प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले आहेत. पालकमंत्र्यांकडूनही पूरग्रस्त भागाची पाहणी झालेली आहे. शासनाने लवकरात लवकर अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. मराठवाड्यात मुसळधार पावसाचा कहर कायम असून नांदेड जिल्ह्यात गुरुवारी ए...
Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!

Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
कंधार, सचिन मोरे| सबंध महाराष्ट्रामध्ये सासर कडून सुनेचा छळ झाल्याच्या अनेक घटना आजही नेहमीच घडत असतात. चित्रपटातून देखील सासूला 'खलनायिका' दाखवल्याचे पहावयास मिळते. सासू व सुनेच्या नात्यांमध्ये भांडणाची परंपरा तशी जुनीच आहे. सासू व सुनेमध्ये नेहमीच वाद होत असतात. वादाचे रूपांतर अनेक वेळेस हाणामारी मध्ये झाल्याचे ऐकण्यात आहे. या सर्व कटू आठवणी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जि.प.सदस्य रामचंद्र येईलवाड व परिवाराने ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी लाकडी लक्ष्मीचा त्याग करत आपल्या तीन सुनांचे ज्येष्ठ व कनिष्ठ गौरी म्हणून पूजन करत समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गौरी पूजनाचे हे त्यांचे पाचवे वर्ष आहे. हिंदू संस्कृतीमध्ये गौरी पूजनास अनन्य साधारण महत्व आहे. सबंध देशांमध्ये घराघरात लक्ष्मीचे मोठ्या थाटामाटात देखावे सजावट करत पूजन ...
error: Content is protected !!