Monday, May 25

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Biloli ; पैशाविना निवडणुकीचा भूमन्ना नरोड यांचा निर्धार; बिलोलीत चर्चा रंगल्या

Biloli ; पैशाविना निवडणुकीचा भूमन्ना नरोड यांचा निर्धार; बिलोलीत चर्चा रंगल्या

नांदेड, राजकीय
बिलोली l बिलोली नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि पदवीधर भूमन्ना पिराजी नरोड यांनी “पैसा खर्च करणार नाही आणि पैसा मिळवण्यासाठी निवडणूक लढवणार नाही” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेने स्थानिक राजकारणात चर्चेची नवी लाट उसळली आहे. नरोड यांच्या या घोषणेला पाठिंबा देणाऱ्यांचे म्हणणे आहे की, निवडणूक ही मूल्यांवर आधारित असावी. पैसा आणि प्रलोभनांवर आधारलेले राजकारण समाजाचे नुकसान करते. तर दुसरीकडे काहींनी हा निर्धार वास्तवापासून दूर असल्याचे म्हणत, “आजच्या काळात पैशाविना निवडणूक लढवणे म्हणजे डिपॉझिट जप्त होण्याचा धोका” असे मत व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे भूमन्ना नरोड हे आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न असून, समाजात प्रतिष्ठित मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामागे आर्थिक मजबुरी नसून विचारांची ताकद आहे, असे समर्थक म्हणतात. हल्लीच्या काळात ...
Dr. Babasaheb Ambedkar ; भुकमारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गटास बियाण्याचे वाटप

Dr. Babasaheb Ambedkar ; भुकमारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गटास बियाण्याचे वाटप

कृषी, नांदेड
उस्माननगर l कृषी विभाग यांच्या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन केलेल्या शेतकरी गटांतील निवडप्रक्रिया मधून भुकमारी ता.कंधार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गट यांची निवड करून २०२५ - २६ बियाण्याचे वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी कंधार कार्यालयामार्फत रब्बी हंगामातील बियाणे वाटप करण्यात आले यामध्ये तालुका कृषी अधिकारी कंधार कासारळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन केलेल्या शेतकरी गटांची निवड करण्यात आली त्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य सन2025-26 सलग हरभरा साठी भूकमारी येथील अनुसूचित जाती जमाती अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहायता शेतकरी गटाची निवड करण्यात आली. गटाचे अध्यक्ष विश्वंभर बळीराम पवार सचिव लक्ष्मण बळीराम पवार यांच्यामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी एसडी उबाळे यांनी गटातील सर्व शेतकऱ्यांना हरभरा बियाण्याच्या लागवड...
Prataprao Patil Chikhlikar ; कोणी मुरूम टाका की डांबर सर्कलच्या विकासासाठी फक्त चिखलीकर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन

Prataprao Patil Chikhlikar ; कोणी मुरूम टाका की डांबर सर्कलच्या विकासासाठी फक्त चिखलीकर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन

नांदेड, राजकीय
उस्माननगर l येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत त्यामुळे पाच वर्ष झोपेत असलेले अनेक पुढारी आता गावोगावी भटकत असून काही भावी उमेदवार लोक रस्त्यावर मुरूम टाकत आहेत काही ठिकाणी चढाओढी करून पट्टी देत आहेत मात्र कुणी मुरुम टाका की, डांबर विकास करण्यासाठी कंधार लोह्याला लागतो फक्त चिखलीकर असे म्हणत आमदार चिखलीकर यांनी विरोधकांची खिल्ली उडवत टीका केली. मारतळा (ता.लोहा) येथे शुक्रवारी (दि.७) रोजी त्रिविक्रम हॉटेलचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती प्रविण पाटील, बालाजी पाटील, आनंदराव शिंदे, शंकरराव ढगे, माजी जि.प.स.गणेश सावळे, सुभाष गायकवाड, सचिन चिखलीकर, गणेश उबाळे , गोविंद जाधव, सरपंच बाळू भरकडे, सुरेश पाटील.शिवराज पाटील.कोंडीबा पाटील.प्रभाकर ढाले. बाबुराव कपाळे.भगवान सोमवारे, केशव ढेपे, संदिप ढेपे, सुमेध गजभारे आदींची...
Guru Teg Bahadur Sahib ji : श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत समागम

Guru Teg Bahadur Sahib ji : श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत समागम

धार्मिक, नांदेड
नांदेड| गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने “हिंद की चादर” श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत (बलिदान) समागम निमित्त दिनांक २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब, नांदेड येथे विविध धार्मिक, सामाजिक व सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांचे आयोजन आदरणीय पंज प्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीखाली व गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे मा. प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह जी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. विशेष कीर्तन दरबार: २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान तख्त सचखंड साहिबच्या दरबार साहिब परिसरात दररोज सकाळी व संध्याकाळी कीर्तन दरबार भरविण्यात येणार आहे. यात पंथप्रसिद्ध रागी जत्थे, कथाकार व प्रवचनकार सहभागी होऊन श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या जीवन व बलिदानावर आधारित कीर्तन व प्रवचन सादर करतील. सद्भावना रॅली: युवा पि...
Shilatai Thakur ; सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.शिलाताई ठाकुर तर राज्यकमिटी पदी कॉ.वर्षाताई सांगडे यांची निवड

Shilatai Thakur ; सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.शिलाताई ठाकुर तर राज्यकमिटी पदी कॉ.वर्षाताई सांगडे यांची निवड

नांदेड, करियर
नांदेड l सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या चौथे राज्य अधिवेशन परळी ( वैजनाथ ) येथील प्रवचन मंडपात ८ व ९ नोव्हेंबर रोजी उत्साहात सपन्न झाले. परळी शहरात मोठी रॅली काढून जाहीर सभा घेण्यात आली. उपरोक्त अधिवेशनासाठी उदघाटक म्हणून फेडरेशनच्या राष्ट्रीय महासचिव कॉ.मधुमिता बंडोपाध्याय ह्या होत्या. निवडक प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा कणा असलेल्या आशा व गटप्रवर्तक ताई मोठ्या संख्येने परळी शहरात दाखल झाल्या होत्या. सदरील अधिवेशन दोन दिवशीय झाले असून सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड, राज्य महासचिव कॉ.ऍड. एम.एच.शेख याची प्रमुख उपस्थिती आहे. मंचावर कॉ.आनंदी अवघडे, कॉ. पुष्पा पाटील,कॉ. शुभा शमीम, कॉ. आरमायटी इराणी कॉ. प्राची हतीवलेकर, कॉ.उज्वला पडलवार, कॉ. डॉ.अशोक थोरात, कॉ.प्रभाकर नागरगोजे, कॉ.मंगल ठोंबरे आदींची उपस्थि...
Himaytnagar Politics Special : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी दाखल नाही; इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण!

Himaytnagar Politics Special : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी दाखल नाही; इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण!

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम तापत असला, तरी दुसऱ्या दिवशीसुद्धा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर ‘मीच पुढचा नगरसेवक, मीच भावी नगराध्यक्ष’ असे संदेश झळकवत असलेले अनेक इच्छुक मात्र अद्याप अर्ज दाखल करण्यापासून दूर आहेत. प्रशासन सज्ज, पण उमेदवार मौन -हिमायतनगर नगरपंचायतच्या १७ नगरसेवक पदांसह थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी नामांकन प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी एक टेबल आणि नगरसेवक पदांसाठी दोन टेबल अशी सोय करण्यात आली आहे. पंचायत समितीचे ओएस गायकवाड, विस्तार अधिकारी प्रमोद टारफे तसेच देवसरकर, देशपांडे आदी अधिकारी उमेदवारी अर्ज स्वीकृतीसाठी कार्यरत आहेत. मात्र ११ नोव्हेंबर सायंकाळपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहित...
Himaytnagar news : हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरचा आठवडी बाजार ठरतोय जीवघेणा अडथळा!

Himaytnagar news : हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरचा आठवडी बाजार ठरतोय जीवघेणा अडथळा!

नांदेड, आरोग्य, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर प्रत्येक बुधवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार नागरिकांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात दुकाने, हातगाड्या व वाहतूक यामुळे अडथळे निर्माण होत असल्याने रुग्णालयात ये-जा करणे अत्यंत कठीण बनले आहे. विशेषतः अति गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी आणताना बाजारातील गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे रुग्णांना योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळण्यात विलंब होतो, आणि त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, “रुग्णालयासमोरील आठवडी बाजार तत्काळ इतर योग्य ठिकाणी हलविण्यात यावा,” अशी मागणी जिल्हा प्रशासन आणि नगरपंचायतकडे करण्यात येत आहे. आरोग्यसेवेच्या दृष्टीने संवेदनशील असल...
Degalur School : “शिक्षण मंदिर की कचराकुंडी स्थळ?” — देगलूर जिल्हा परिषद हायस्कूलची विदारक अवस्था!

Degalur School : “शिक्षण मंदिर की कचराकुंडी स्थळ?” — देगलूर जिल्हा परिषद हायस्कूलची विदारक अवस्था!

करियर, नांदेड
नांदेड/देगलूर (गोविंद मुंडकर) राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा — तिन्ही स्तरांवर लोकप्रतिनिधी असलेला देगलूर मतदारसंघ... पण शिक्षणाच्या मंदिराची अवस्था पाहून कोणालाही लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली जिल्हा परिषद हायस्कूल, देगलूर, आज शिक्षणाचं केंद्र नसून अस्वच्छतेचं आणि दुर्गंधीचं केंद्र बनली आहे. शाळेच्या बाहेरील भिंतींवर लघवी, आजूबाजूला कचऱ्याचे ढीग, आणि वर्गांच्या परिसरात पसरलेली दुर्गंधी — अशा परिस्थितीत शेकडो विद्यार्थी रोज शिक्षण घेत आहेत. शाळेच्या भिंतींना सार्वजनिक शौचालयाचे स्वरूप प्राप्त झाले असून, दररोज १०० ते २०० नागरिक शिक्षणासाठी नव्हे तर लघवीसाठी या शाळेत येतात, ही अतिशय संतापजनक बाब आहे. ही शाळा त्या भागातील आहे जिथे राज्यसभेत अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे, लोकसभेत रवींद्र चव्हाण, आणि विधानसभेत जितेश अंतापुरकर हे प्रतिनिधित्व कर...
Degalur Murder : किरकोळ वादातून तरुणाचा खून — देगलूर शहर हादरले!

Degalur Murder : किरकोळ वादातून तरुणाचा खून — देगलूर शहर हादरले!

क्राईम, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील नवीन सराफा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ आणि जुन्या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अंबिका ऑईल मिलच्या बाजूस असलेल्या देशी दारू दुकानात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव शेख निसार शेख बाबुमिया (वय ३०, रा. मदीना मस्जिद, लाईन गल्ली, देगलूर) असे आहे. किरकोळ वादावरून झालेल्या भांडणात आरोपीने शेख निसार यांच्या मानेवर धारदार वस्तूने वार केला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्थागुशा आणि देगलूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिसराचा पंचनामा करून साक्षीदारांची चौकशी सुरू केली. दरम्यान, आरोपी स्वतःच पोलिस ठा...
agricultural produce : किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू 

agricultural produce : किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू 

नांदेड, कृषी
नांदेड| केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत दराने सोयाबीन, मूग व उडिद खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.  नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी वरील नोंद, 7/12, आधारकार्ड, आधारलिंक बँक खाते इत्यादी आवश्यक कागदपत्रानुसार आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी अथवा NAFED  ई-समृध्दी या मोबाईल ॲपद्वारे स्वंनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहूराज हिरे यांनी केले आहे. या खरेदी केंद्रावर फक्त एफएक्यु दर्जाचा शेतमालाची खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल स्वच्छ व चाळणी करून खरेदी केंद्रावर आणण्याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.    राज्यात 18.50 लाख मे.टन सोयाबीन, 33 हजार मे. टन मूग व 3.25 लाख मे. ट...
error: Content is protected !!