HomeनांदेडNBA ranking : शासकीय तंत्रनिकेतन नांदेडला एनबीए मानांकन : शिक्षण क्षेत्रात यशाची...

NBA ranking : शासकीय तंत्रनिकेतन नांदेडला एनबीए मानांकन : शिक्षण क्षेत्रात यशाची भर

नांदेड| शासकीय तंत्रनिकेतन नांदेडच्या सिव्हिल, माहिती तंत्रज्ञान व विद्युत अभियांत्रीकी या विभागाला 31 डिसेंबर2028 पर्यंत तसेच यंत्र व उत्पादन अभियांत्रिकी या विभागाला दि. 30 जून 2027 पर्यंत National Board of Aceridinarion (NBA) कडून मानांकन प्राप्त झाले आहे.

राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) ही भारतातील एक स्वायत्त संस्था आहे जी अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि मान्यता राष्ट्रीय स्तरावर देते. सदर राष्ट्रीय मानांकण हे विभागाच्या दर्जेदार, शैक्षणिक आणि तांत्रिक सुविधासाठी मिळाले आहे.

एनबीए मान्यता प्रक्रियेत अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि मुल्यांकन प्रणाली इ. बाबींची कसून तपासणी केली जाते. राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण, चांगल्या नोकरीच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यात मदत होते. यामुळे शिक्षण शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होते.

तसेच संस्थेच्या वैद्यकीय अणुविद्युत या विभागाला MSBTE कडून मागील वर्षाकरिता शैक्षणिक तसेच गुणवत्तेच्या आधारे उत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्याकडून संस्थेस २६ जुन 2027 पर्यंत प्रमाणित करण्यात आले आहे. नजिकच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त शाखांना मानांकन मिळणारी मराठवाड्यातील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड ही दुसरी संस्था ठरली आहे. त्यामुळे संस्थेची मान नक्कीच उंचावलेली आहे.

सदरील मानांकनासाठी विभागाचे संचालक तसेच सहसंचालक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. एन. एल. जानराव यांनी तसेच संस्थेचे एनबीए समन्वयक डॉ.गणेशडी अवचट यांनी समाधान व्यक्त केले असून, हे यश सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे फळ असल्याचे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण यश ठरले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments