NBA ranking : शासकीय तंत्रनिकेतन नांदेडला एनबीए मानांकन : शिक्षण क्षेत्रात यशाची भर
नांदेड| शासकीय तंत्रनिकेतन नांदेडच्या सिव्हिल, माहिती तंत्रज्ञान व विद्युत अभियांत्रीकी या विभागाला 31 डिसेंबर2028 पर्यंत तसेच यंत्र व उत्पादन अभियांत्रिकी या विभागाला दि. 30 जून 2027 पर्यंत National Board of Aceridinarion (NBA) कडून मानांकन प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) ही भारतातील एक स्वायत्त संस्था आहे जी अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि मान्यता राष्ट्रीय स्तरावर देते. सदर राष्ट्रीय मानांकण हे विभागाच्या दर्जेदार, शैक्षणिक आणि तांत्रिक सुविधासाठी मिळाले आहे.
एनबीए मान्यता प्रक्रियेत अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि मुल्यांकन प्रणाली इ. बाबींची कसून तपासणी केली जाते. राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण, चांगल्या नोकरीच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यात मदत होते. यामु...
