Smuggling of sand from Forest Development Corporation reserve forests | वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी… NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| गेल्या अनेक दिवसापासून वनविकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांना सतत हुलकावणी देऊन वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टर वर वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडून ही कारवाई केल्याने वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
मराठवाड्यातील एकमेव घनदाट जंगल असलेलं किनवटचं जंगल हे सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असुन अशा या घनदाट जंगलासाठी जंगलासाठी महाराष्ट्र शासनाने काही भाग वन विकास महामंडळाकडे दिला आहे तर काही भाग प्रादेशिक वन विभागाकडे दिला आहे. अशा या किनवटच्या घनदाट जंगलासाठी असे वेगवेगळे दोन वन विभागाचे डिपार्टमेंट या राखीव जंगलाचे संगोपन आणि संरक्षण करत असतात.
अशा या वन विकास महामंडळाच्या शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोंड जेवली राखीव जंगलामधून दिनांक 17 जुलै...









