Wednesday, May 13

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nanded Police । नांदेड परिक्षेत्राच्या नूतन पोलीस उपमहानिरीक्षक पदी शहाजी उमाप यांची नियुक्ती -NNL

Nanded Police । नांदेड परिक्षेत्राच्या नूतन पोलीस उपमहानिरीक्षक पदी शहाजी उमाप यांची नियुक्ती -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। नांदेड परीक्षेत्राचे नूतन पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून तत्कालीन पोलीस अधिकारी शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमाप यांच्या बदलीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच स्वागत केले जात असून, नांदेड पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड विशेष परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर यांची बदली पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात झाल्यानंतर नांदेडची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमाप यांनी यापूर्वी नांदेडमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि सामाजिक दृष्टिकोन ठेऊन वेळप्रसंगी कठोर भूमिका घेणारे अधिकारी म्हणून ओळख आहे. आगामी काळात विधानसभा निवडणूक व सण उत्सवाचे वातावरण रहाणार असल्याने तत्पूर्वी प्रमुख ...
An inveterate criminal | एक अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात -NNL

An inveterate criminal | एक अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 37 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमन्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. आज पावेतो 26 टोळ्यामधील 79 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन, MPDA अंतर्गत 16 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस ठाणे विमानतळ यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे शशिकांत सखाराम भडगळ वय 22 वर्ष राहणार कर्मविरनगर, नांदेड याचेवर गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल अस...
दोन विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन चोरीचे पाच गुन्हे उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई – NNL

दोन विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन चोरीचे पाच गुन्हे उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून आणलेला मुद्देमालासह स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना मुद्देमालासह अटक केली आहे. लहान वयात हि बालके चोरीच्या मार्गाला लागली असून, त्यांना असे प्रकार करण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाला विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. नांदेड जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करण्यासंदर्भात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आपले सहकारी सहा.पो.नि. संतोष शेकडे व पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथकाला नांदेड जिल्हयात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आनणे कमी रावण केले असता दिनांक 08/07/2024 रोजी संतोष शेकडे, सपोनि, साईनाथ पुयड पोउपनि स्थागुशा नांदेड यांचे टिमने नांदेड...
दोन आरोपिकडून स्थानिक गुन्हे शाखेने केले पाच खंजर जप्त -NNL

दोन आरोपिकडून स्थानिक गुन्हे शाखेने केले पाच खंजर जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरातील अवैद्य शस्त्र बाळगणारे व विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करणे बाबत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना अवैद्य शस्तस्त्र बाळगणारे व विक्री करणारे इसमांची माहिती काढणे बाबत सुचना दिल्या होत्या. दिनांक 05.07.2024 रोजी सहा. पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, पोलीस उप निरीक्षक साईनाथ पुयड हे पोलीस अंमलदार यांचे सह नांदेड शहरात पेट्रोलींग करीत असतांना लातुर फाटा येथील नांदेड ते लातुर जाणारे रोडवर दोन संशईत इसम नामे 1. शेरासिंघ पापासिंघ टाक वय 34 वर्ष रा. बालाजी मंदिर जवळ, सोनखेड ता. लोहा जि. नांदेड आणि 2. पप्पीसिंघ सेलुसिंघ टाक वय 25 वर्ष रा. नविन कौठा, नांदेड हे मोटार सायकलवर फिरतांना दि...
अवैध सागवान, टाटा इंडिका सहीत एकुण पाच लाख पस्तीस हजारांचा माल जप्त -NNL

अवैध सागवान, टाटा इंडिका सहीत एकुण पाच लाख पस्तीस हजारांचा माल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
किनवट,परमेश्वर पेशवे। दिनांक 03 जुलै रोजी अंबाडी - धामणदरी रोडवर गस्त करत असतांना संशयावरून पांढऱ्या रंगाची tata intra v30 मध्ये अवैध सागी गोल माल भरताना दिसली असता सदर आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन सोडून आरोपी पळून गेले. टाटा इंडिका tata intra v30 वाहन क्रमांक MH 26 CH 0476 पकडण्यात आले सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधसागी गोल नग -15 आढळून आले. आज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हया कार्यवाहीत मा. उपवनसंरक्षक नांदेड श्री केशव वाबळे साहेब मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी. डी.गिरी साहेब मा.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.किनवट पी. एल.राठोड यांच्या मार्गद्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी अंबाडी बी. एस संतवाले, एम.एन. कतुलवार, एस. एम. कोम्पलवार, एस. एम. यादव, हारी चौधरी पाटील, वनरक्षक कु.एस एस.काकडे, मुकुंद डोईफोडे, रवि दांडेगावकर, कल्पना खराटे तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवल...
सहस्रकुंड येथील वन जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाने दुसऱ्यांदा हटविले -NNL

सहस्रकुंड येथील वन जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाने दुसऱ्यांदा हटविले -NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ परिसरातील वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागाने अनेक वेळा नोटीस बजावून देखील सहस्त्रकुंड येथील शेतकऱ्याने वन जमिनीवर अतिक्रमण करून सोयाबीनची पेरणी केल्याने इस्लापूर वन विभागाने पोलीस बंदोबस्तात वन जमिनीवरील अतिक्रमण निष्काशीत करून पोलीस बंदोबस्तातच इस्लापूर वन विभागाने त्या अतिक्रमण जमीनीवर वन महोत्सव अंतर्गत पोलीस बंदोबस्तातच वृक्षारोपणाची लागवड केली. नांदेड किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा हा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असुन, अशा या प्रसिद्ध ठिकाणी असलेल्या वाळकी (बु) सर्वे नंबर 52 येथील वन जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्यावेळेस देखील पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवल्याने त्यावेळी या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मात्र या शेतकऱ्यांनी पुन्हा यावर्ष...
6 जुलै सकाळी 6 पासून ते 20 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

6 जुलै सकाळी 6 पासून ते 20 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात 6 जुलै 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जुलै 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 6 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 20 जुलै 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना...
हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेत रक्कम भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या बैगेतून 41 हजाराची रक्कम लंपास-NNL

हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेत रक्कम भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या बैगेतून 41 हजाराची रक्कम लंपास-NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। भारतीय स्टेट बैंकेत मायक्रो फायनान्स कंपनीची जमा झालेल्या वसुलीची रक्कम भरण्यासाठी गेले असता लाईनमध्ये उभे असलेल्या पाठीमागील कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने बैगेची चैन काढून वरील 41 हजार 460 रूपयाची रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, वारंवार बैंकेतून अशी रक्कम चोरी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा गार्ड नेमण्यात आल्यानंतर देखील बैंकेतून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आकाश भगवान जोगदंड वय 24 वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी रा. गोडवडसा ता. माहूर जि. नांदेड हा. मु. रेल्वेस्टेशन रोड हिमायतनगर हे नेहमीप्रमाणे B.S.S. MICROFINANCE कंपनीचे वसूल झालेली 4 लक्ष 61 हजार 460 रूपयांची रक्कम भरण्यासाठी भारतीय स्टेट बैंकेत गेले होते. बुधवार आठवडी बाजार असल्याने आणि खरीप हंगाम असल्याने बैंकेत गर्दी ...
हिमायतनगर चाकू हल्ला प्रकरणी दोघांवर झाले परस्पर विरोधी गुन्हे दाखल – NNL

हिमायतनगर चाकू हल्ला प्रकरणी दोघांवर झाले परस्पर विरोधी गुन्हे दाखल – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| हिमायतनगर शहरातील चाकू हल्ला प्रकरणी दोन्ही जखमींवर नांदेड येथे उपचार सुरु असल्याने पोलिसांनी खागजी रुग्नालयात जाऊन दोघांचे जवाब घेऊन दिलेल्या फिर्यादीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. एकूणच हिमायतनगर शहरात घडलेल्या चाकू हल्ल्याचा प्रकार तुम्ही आमची बदनामी का...? करता आणि जुन्या राजकीय वादावरून घडली असल्याचे पोलीस डायरीवरील नोंदीवरून समोर आले आहे. दरम्यान आज माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी परमेश्वर मंदिरासमोर जमा होऊन मुख्य रस्त्याने मोर्चा काढून पोलीस ठाण्यात तासभर ठिय्या आंदोलन करून मागण्याचे निवेदन पोलिसांना दिले. याबाबत सविस्तर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी कि, चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कुणाल पि. रामराव राठोड वय 40 वर्ष व्यवसाय आरामशीन रा. बाजार चौक, ता. हिमायतनगर जि नांदेड मो क्रंमाक ९४२२४३...
12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण मुलीची टी.सी. काढण्याकरीता 12 हजाराचं कुलर मागितल ; नायगाव तालुक्यातील संस्थाचालक मुख्याध्यापकावर गुन्हा -NNL

12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण मुलीची टी.सी. काढण्याकरीता 12 हजाराचं कुलर मागितल ; नायगाव तालुक्यातील संस्थाचालक मुख्याध्यापकावर गुन्हा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। मुलीची 12 वी विज्ञान शाखेची टी.सी. काढण्यासाठी शाळेत जावून संस्थाचालक मनोहर पवार यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीची टि.सी. देण्याकरीता 12,000/- रूपये किंमतीचे सिम्पनी कंपनीचे कुलरची मागणी केली. आणि तडजोडीअंती रूपये 3,000/- पंचासमक्ष मोबाईल फोनद्वारे लाचेची मागणी करून लाच रक्कम कॉलेजचे मुख्याध्यापक बहिनाजी वरवंटे, मुख्याध्यापक तथा प्राचार्य, मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोमठाणा ता.नायगाव, जि.नांदेड यांच्याकडे देण्यास सांगितले. हा प्रकार लाच देण्यासारखे आसल्याचे लक्षात आल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संस्थाचालक आणि मुख्याध्यापक तथा प्राचार्य, मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोमठाणा ता.नायगाव, जि.नांदेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स...
error: Content is protected !!