नांदेडलाइफस्टाइल

Hands-on training : नदीकाठावरील गावात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण

नांदेड/धर्माबाद| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता संगम (संगमेश्वर देवस्थान) येथे नदीकाठावरील गावात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्यात आले.

या प्रशिक्षणाचे आयोजन प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. NDRF पुणे पथकाचे कमांडर राजेंद्र कांबळे यांनी पुर, भूकंप, आग इत्यादी आपत्तींच्या वेळी बचाव व तात्काळ प्रतिसाद याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या वेळी तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंडलवाडी, उपविभागीय कार्यालय धर्माबादचे नायब तहसीलदार, तसेच तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आपत्ती काळात सज्जतेची भावना निर्माण झाली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button