हिंगोली| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरु करून सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्यकाळात राबविल्या जाणाऱ्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे चांगले काम शिवसैनिकांनी करावे असे आवाहन आ.संतोष बांगर यांनी केले.
हिंगोली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. संतोष बांगर व माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या हिंगोली येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या आढावा बैठकिस उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खास करून महिलांसाठी लाडकी बहीण योजना, महिलांसाठी अर्ध तिकीट, जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बस सेवा, सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा यासह अनेक जनकल्याणकारी योजना सुरु केल्या. यासह इतर सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी असे आवाहन केले. यावेळी संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्यासह हिंगोली, वसमत येथील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
वारंगा फाटा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व श्री ओम कदम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ थोरात, ग्रा.प.सदस्य जनार्दन थोरात, राजेंद्र थोरात, सुनील थोरात, ज्ञानेश्वर थोरात, अनिल थोरात, देविदास बोडखे, रामा नरवाडे, सुबोध कदम, ज्ञानेश्वर कदम, प्रतापराव पतंगे कुर्तडी, विनोद पानपट्टे, दीपक वाडसवार, धम्मरतन थोरात, नवनाथ जाधव, संभाजी लुटे, किशन कदम, दिगंबर पतंगे, प्रमोद कदम व इतर अनेक मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.