हिमायतनगर,अनिल मादसवार| कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरु झालेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या काकडा दिंडीचा दि.१६ शनिवारी शहरातील मुख्य रस्त्याने पालखी दिंडी काढून समारोप करण्यात आला. दरम्यान पालखी दिंडी येताच प्रसिद्ध व्यापारी पळशीकर बंधूं परिवाराच्या वतीने दिंडीत सामील झालेल्या शेकडो महिला पुरुष भाविक भजनी मंडळींचा शाल, पुष्पहाराने स्वागत सन्मान करण्यात आला.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कार्तीक मासात अखंडपणे चालत आलेला काकडा आरती दिंडी समाप्ती निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्याने टाळ मृदंगाच्या वाणीतून भव्य पालखी दिंडी व शोभा यात्रा काढण्यात आली होती. येथील श्री परमेश्वर मंदिरातर्फे काढण्यात आलेल्या काकडा आरती दिंडीत शेकडोच्या संख्येने महिला पुरुष वारकरी संप्रदायातील भजनी मंडळी सामील झाली होती. दिंडीची सुरुवात जेष्ठ संचालक वामनराव बनसोडे यांच्या उपस्थिती करण्यात आली. यावेळी बाबुराव भोयर गुरुजी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, दर्शनार्थी भक्त, बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेली पालखी दिंडी शहरातील मुख्य रस्त्याने निघाल्यानंतर महिला- पुरुष नागरिकांनी पालखीचे दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केले. टाळ मृदंग व भक्तिमय वातावरणात निघालेल्या पालखी दिंडीचे आगमन बाजार चौकात होताच प्रसिद्ध व्यापारी सुरेश पळशीकर यांच्या पुढाकारातून दिंडीत सामील झालेल्या शेकडो महिला पुरुष भाविक भजनी मंडळींचा शाल, पुषपहाराने स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी श्यामअण्णा मारुडवार, प्रवीण जन्नावार, पांडुरंग तुप्तेवार, संतोषआप्पा पळशीकर, बाळूअण्णा चवरे, नंदकुमार पळशीकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती. दिंडी परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर भव्य महाप्रसादाने काकडा दिंडीचा समारोप करण्यात आला.