नांदेड,विशेष प्रतिनिधी| लातूर लोकसभा मतदार संघान भाजपा उमेद्वार सुधाकर श्रृंगारे यांचा काँग्रेस उमेदवार डॉ शिवाजी कळगे यांनी ६१ हजार ८८१ मतांनी पराभव केला. लातूर ग्रामिण व शहर तसेच निलंगा तीन मतदार संघात मोठी पिछेहाट झाली. उदगीर, अहमदपूर मतदार संघान थोडी आघाडी तर लोहा मतदार संघ जवळपास बरोबरी राहिली. मागील निवडणूकीत काँग्रेस उमेदवार २ लक्ष ८९ हजार मतांनी पराभूत झाला होता. पण यंदा ती लीड भरून काढत काँग्रेसने भाजपची हॅट्ट्रिक हुकविली.. भाजपा विरोधी वातावरण, स्वतः ची कोणतीच प्रभावी व सक्षम यंत्रणा नसणे व पूर्णत: पक्ष संघटनेवर अवलंबून राहणे ,संपर्क नसणे, विश्वासू कार्यकर्ते तयार न करणे याचा मोठा फटका सुधाकर शृंगारे यांना बसला. भाजपाचीसोशल मीडिया ऐनवेळी फेल झाली. ” थ्री-एम” (मराठा-मुस्लिम- मागासवर्गीय) ‘च्या नाराजीचा फटका पक्षाला बसला त्याचा रोष मतपेटीतून दिसला.
लातूर मतदार संघात काँग्रेस पक्षाचे डॉ शिवाजी काळगे यांना ६ लक्ष ९ हजार २१ मते तर भाजपाचे खासदार सुधाकर शृंगारे यांना ५ लक्ष४७ हजार १४० मते पडली. वंचितचे नरसिंग उदगीरकर यांना केवळ ४२ हजार २२५ मते मिळाली. कॉग्रेस उमेदवार डॉ कोळगे हे ६१ हजार ८८१ मतांनी विजयी झाले. २०१९ मागील निवडणूकीत २ लक्ष ८९ हजार १११ मताची लीड भाजपाला होती. काँग्रेस उमेदवाराला ३ लक्ष ७० हजार ८३५ एवढी मते तर भाजपाला ६ लक्ष ६१ हजार ४९५ मते मिळाली होती, वंचितच्या उमेदवाराला १ लक्ष १२ हजार २१५ मते पडली. २०१९च्या तुलनेत काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत २ लक्ष ३८ हजार १८६ मते अधिकची मिळाली.
लोकसभा निवडणुक काळात मराठा आरक्षण आंदोलन, भाजपा विरोधी रोष, फोडाफोडी, “थ्री -एम” यांचा प्रचंड रोष,महागाई बेरोजगारी शेतीमालाला भाव, संविधान बचाव काँग्रेसचा प्रचार या सगळया भाजपा विरोधात तर होत्याच. शिवाय ‘ उमेदवार माला जंगम – लिंगायत त्यामुळे एकगठ्ठा मते वळली. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. आ. अमित देशमुख व टीम यांचे परिश्रम व रणनीती यशस्वी ठरलीउलट भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत २ लक्ष ८९ हजार १११ मनाची लीड होती. यावेळी १ लक्ष १४ हजार ३५५ मते कमी पडले.पक्षाला त्याचा फटका बसला.
लातूर शहर -ग्रामीण- निलंगा “पंजा”आघाडीवर
काँग्रेस पक्षाला लातूर ग्रामीण मध्ये १६ हजार ६५८ मते, लातूर शहर मतदार संघात ३० हजार १३४ मते, निलंगा विधानसभा मतदार संघान २० हजार २१७ मतांची आघाडी मिळाली. लोहा मतदार संघात केवळ २ हजार ७९३ मतांनी “कमळ” मागे राहिले. भाजपा उमेदवाराला उदगीर मध्ये ४ हजार ७९६ व अहमदपूर मध्ये ३ हजार ५२८ मताची आघाडी मिळाली.
जाती निहाय मतदान-ओबीसी फॅक्टर
लातूर मतदार संघात काँग्रेस उमेदवार( लिंगायत )-माला जंगम असल्याने त्यांच्याकडे जात समूह वळला तर भाजपा उमेदवारासाठी बौद्ध समजा सरसावला ओबीसी समूहाने “कमळ” धरले. उदगीर अहमदपूर या जळकोट या भागात तसेच संपूर्ण मतदार संघात ओबीसी “भाजपाकडे गेल्याचे दिसले. पण “थ्री एम “चा जबर फटका पराभवास कारण ठरला. वंचितचे नरसिंग उदगीरकर याना केवळ ४२ हजार २२५ इतकीच मते मिळाली. २०१९ च्या तुलनेत ७० हजार मतांची घट झाली. लोहा मतदार संघात तर केवळ ९ हजार ३५३ मते त्यांना मिळाली त्यामुळे वंचित फॅक्टर फेल गेले. भाजपाची हॅट्ट्रिक हुकली २००९ नंतर पुन्हा काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आले. येत्या काळात या मतदार संघाची न्यायालयीन लढाई सुरू होईल असे दिसते.