नांदेडसोशल वर्क

Tiger organizations : टायगर संघटनेच्या सदस्याचा आदर्शवत प्रामाणिकपणा – ₹17,000 चा मोबाईल परत

नांदेड | आजच्या धावपळीच्या जगात प्रामाणिकपणा हा दुर्मिळ होत चालला असला तरी नांदेडमध्ये एका ऑटो रिक्षा चालकाने दाखविलेल्या सचोटीने समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.

९ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे सदस्य शेख सुफियान रफिक (राहणार फारुख नगर, नांदेड) आपल्या रिक्षामध्ये प्रवासी भगवानराव मारोतराव पतंगे (रा. येळेगाव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांना घेऊन गेले. प्रवासादरम्यान प्रवाशांचा ₹17,000 किमतीचा मोबाईल रिक्षात राहून गेला.

लक्षात येताच भगवानराव यांनी चौकशी केली असता संघटनेचे सदस्य शेख अहमद यांनी तात्काळ सुफियानशी संपर्क साधला. सुफियान यांनी मोबाईल सुरक्षित असल्याचे सांगत तो परत करण्याची तयारी दर्शविली.

ही माहिती टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी वाहतूक पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे व वजीराबाद पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या उपस्थितीत मोलाना अबुल कलाम आझाद ऑटो रिक्षा स्टॅण्ड येथे प्रवासी भगवानराव पतंगे यांना त्यांचा मोबाईल परत केला.

या वेळी टायगर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य संदीप राठोड, शेख अहमद, शेख इसाक, ठाकूर, डुकरे पाटील, नासेर खान, सावकार यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. शेख सुफियान यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button