नांदेड| राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत सन् २०२३ – २४ या वर्षातील रखडलेल्या निवड यादी तात्काळ जाहिर करा.या मागणीसाठी वयोवृद्ध कलावंतांचा दि ९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे भजन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र चा भजन आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यासाठी विलासराव बोडगे (उपाध्यक्ष,मान्यवर वृद्ध साहित्यिक व मान्यवर वृद्ध कलावंत जिल्हास्तरीय मानधन निवड समिती,नांदेड), सन्माननीय सदस्य मान्यवर वृद्ध साहित्यिक व मान्यवर वृद्ध कलावंत जिल्हास्तरीय मानधन निवड समिती,नांदेड) – शाहीर सुर्यकांत शिंदे,शिवाजी चित्तरवार,ज्ञानोबा बाबर, पंढरीनाथ मुरकुटे,शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर,शाहीर नामदेव जाधव,उत्तम भगत,उत्तम माने,बालाजी पांचाळ महाराज,अरविंद महाराज सोनखेडकर,संभाजी सावते, मारोती बागले,विठ्ठल शिंदे व सर्व कलावंत,शाहीर नांदेड जिल्हा यांनी पाठींब्याचे निवेदन दिले आहे.
राजश्री शाहू महाराज साहित्यिक व कलावंत सन्मान मानधन योजनेचे अध्यक्ष सचिव यांच्या उपस्थितीत दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी ला बैठक घेण्यात येऊन वयोवृद्ध कलावंतांच्या प्रस्तावाची छाननी करून शंभर वयोवृत्तकलांतांची निवड करण्यात आली होती परंतु लोकसभेचे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे यादी रखडली आहे तसेच दिनांक १६ मार्च २०२४ रोजी या नव्याने शासन निर्णय निघून त्यामध्ये शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान मानधन योजनेचे अध्यक्ष म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड व समितीचे सदस्य सचिव म्हणून माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे वर्ग करण्यात आला. पण यापूर्वी या समितीचे सदस्य सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद होते.
समितीचे अशासकीय सदस्य व काही वयोवृद्ध कलावंतांना सोबत घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक एक सात 2024 रोजी सविस्तर निवेदन देऊन सन 2023 24 ची वयोवृत्त १०० कलावंतांची निवड मागील समितीत केलेली आहे त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांसोबत सविस्तर चर्चा करून नियोजन दिले जिल्हाधिकारी साहेब यांनी दहा दिवसात बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले परंतु आज पर्यंत दिलेल्या नियोजनाची दखल अद्यापि घेतली नाही. यामुळे हतबल झालेल्या वयोवृद्ध कलावंतांनी दिनांक ९ ऑगस्ट रोजी भजन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
लोकपारंपारिक कलावंतांच्या पाठिशी आम्ही सदैव कर्तव्यतत्पर आहोत असे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी पाठिंबा देत मत व्यक्त केले आहे.यावेळी बहुजन टायगर युवा फोर्स चे राज्य प्रवक्ते यांनी तमाम लोकपारंपरिक कलावंतांनी व शाहिरांनी या भजन आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या भजन आंदोलन कर्त्यांच्या मागणी पुढीलप्रमाणे आहेत.- राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत सन् २०२३ – २४ या वर्षातील रखडलेल्या निवड यादीला तात्काळ मान्यतेसह लाभार्थींना मानधन वाटप करा.मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावा.
या आंदोलनासाठी शाहीर बापुराव जमधाडे, शाहीर रमेश नारलेवाड,शाहीर शंकर गायकवाड,सुभाष गुंडेकर,साहित्यिक कवी विजय वाठोरे, शाहीर नरेंद्र दोराटे,सुमेध एडके, जगन्नाथ नरवाडे,शिवाजी डोखळे,अविनाश कदम, नागोराव मेंडेवाड,जळबा जळपते,परमेश्वर वालेगांवकर, केशव माने,गौतम राऊत,दिपक गजभारे,बालाजी राऊत,सचिन कांबळे,सिद्धू कवडे,पांडुरंग मिरासे,शाहीर कल्याण डोणेराव, राजरत्न खिल्लारे,सौ.सुरेखा रंगारी,सौ.सुरेखा डोखळे, लक्ष्मीबाई खरोडे व सर्व सन्माननीय पदाधिकारी,कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.