हिमायतनगर, अनिल मादसवार| सभेला लाडक्या बाहीने, लाडके भाऊ, लाडके शेतकरी व लाडके जेष्ठ मोठ्या संख्येने येथे उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद देतो. महाल भेटण्यासाठी तुमचा दर्शन घेण्यासाठी तुमचा लाडका भाऊ म्हणून मी येथे आलो आहे. राज्य शासनाने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून दिवाळीची ओवाळणी दिली. लाडक्या बहिणीची योजना बंद करण्यासाठी विरोधक मात्र कोर्टात गेले. परंतू तेथे त्यांची दाळ शिजली नाही हि बाब लक्षात घेता अश्या या सावत्र भावाला त्यांची जागा दाखवून द्या. तुमचा आशीर्वाद मिळाला तर मानधनात वाढविणार आहोत… त्यामुळे येत्या २० तारखेला महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना साथ द्या. हदगाव व हिमायतनगर शहराला एम आय डी. सी. मंजूर करून देतो, तसेच शेतकर्याच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ते हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर प्रांगणात आयोजित शिवसेना, भाजप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजना सभेच्या मंचावरून बोलत होते. मंचावरून उपस्थित जनसागराला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, काँग्रेसवाले म्हणतात कि, भाजप शिवसेनेचे सरकार संविधान बदलणार, असे खोटे दावे विरोधक करीत आले आहेत. परंतू आम्ही कदापी घाबरणारे नसून, विरोधकांना पुरून उरलो आहे. फक्त या निवडणुकीत आपली साथ हवी आहे. आम्ही अडीच वर्षापुर्वी बंड केलं. उबाठाच्या लोकांनी सत्तेच्या मोहापायी शिवसेनेचा धनुष्यबाण कॉग्रेस कडे घान ठेवला होता. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराना तडा जावू देणार नाही याची शपथ घेतली. आणी शिवसेनेचा धनुष्यबाण आम्ही सोडून आणला.
भुकल्ल्याना अन्न, वस्त्र, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही ज्या ज्या योजना अमलात आणल्या त्या योजनांच्या मानधनात वाढ करून कुणाला वंचित ठेवणार नाही असा निर्णय घेतला आहे. अनेक विकासाची कामे तर केलीच, परंतू बाळासाहेबांच्या विचाराचे पावित्र्य आम्ही राखले आहे. बाळासाहेबांचं हिंदूत्वाचा जागर आम्ही करतो आहोत, हेच उबाठा वाल्यांना सहन होत नाही. असे मुख्यमंत्री एकनाथ शिदे म्हणाले. हेमंत पाटील यांच्या मागणीनुसार पैनगंगेवरील उच्च पातळी बंधाऱ्याला मंजूरी दिली. शेकडो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतकयांच्या साढेसात एचपीचे बिल माफ करणार आहोत. शासनाने अनेक लोकाभिमुख योजना अंमलात आणल्या.
महायुतीचे सरकार देणारे आहे घेणारे नाही. रेवड्यांचे सरकार अशी टीक सरकारवर झाली. मात्र, महायुतीच्या योजना महाविकास आघाडीने चोरल्या आणि त्याच समावेश जाहीरनाम्यात केला. तीन हजार रूपये देतो अशी घोषणा केली. कर्नाटक, हिमचल प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यात काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे. आता ते केंद्र सरकारकडे बोट दाखवित आहेत. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यावर काय चमत्कार होतात हे सर्वांनी अडीच वर्षात पाहिले आहे. आता निवडणकीच्या कालावधीत खोटे राजकीय कथानक ( फेक नरेटिव्ह) पसरविण्याचा प्रयत्न केला जाईल. जाती जातीत तेढ निर्माञ करण्याचे, विद्वेष पसरवून राजकीय पोळी भाजली जाईल. त्यामुळे जागरूक राहून महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावायचे आहेत. आम्ही चालू केलेल्या योजना यशस्वी पणे राबविण्यासाठी पुढेही या सर्व योजना चालू ठेवण्यासाठी बंधू भगिनींनी महायुतीला साथ द्यावी. असे अवाहन ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी मंचावर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे, हिंगोलीचे माजी खासदार तथा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील, जेष्ठ नेते गोपालभाऊ सारडा, प्रतापराव देशमुख सरसमकर, शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, सुधाकर भोयर, गुणवंत पाटील हंगरगेकर, आदींसह हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठाचे माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, माजी जि प सदस्य अनिल पाटील बाभळीकर, काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, काँग्रेस सेवादलाचे जिवन आडे, माजी नगरसेवक सावन डाके, यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.