हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीतील भाजप–शिंदे शिवसेना युतीच्या हिमायतनगर शहर विकास आघाडीच्या गटनेतेपदी वॉर्ड क्रमांक 10 चे नगरसेवक श्री आशिष सकवान यांची निवड करण्यात आली आहे.


या निवडीसाठी मा. मुख्यमंत्री तथा खासदार ना. अशोक चव्हाण, मराठवाडा संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे, हादगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कोहळीकर, भाजप नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, सभापती गंगाधर पाटील तसेच भाजप नेते डॉ. राजेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.

या निवडीचे अधिकृत पत्र मा. जिल्हाधिकारी श्री राहुलजी कार्डिले यांच्याकडे नांदेड येथे सादर करण्यात आले. तसेच यावेळी स्वीकृत सदस्य पदासाठी डॉ. राजेंद्र वानखेडे यांचा नामनिर्देशन अर्जही दाखल करण्यात आला.


श्री आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर विकास आघाडी अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना–भाजपचे नगरसेवक सौ. दर्शना शरद चायल, सौ. अरुणा भगवान मुद्देवाड, सुभाष बलपेलवाड, भारत डाके, गजानन चायल, राम सूर्यवंशी यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल युतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


