नांदेड| शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी काल दि. 3 ऑगस्ट रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, यावेळी शरदचंद्र पवार यांचा आशाताई शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी शरदचंद्र पवार व आशाताई शिंदे यांच्यामध्ये लोहा कंधार मतदार संघातील विविध विषयावर सखोल करण्यात आली,आगामी होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात शरदचंद्र पवार व आशाताई शिंदे यांच्यामध्ये यावेळी तासभर चर्चा झाली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथे त्यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याने लोहा कंधार मतदारसंघात नक्कीच तुतारी वाजणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघातील जनतेतून होत आहे, यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.