हदगाव, शेख चांदपाशा| मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य आणि आत्मिक समाधान प्राप्त करून देणारे “आर्ट ऑफ लिव्हिंग” संस्थेचे आनंद अनुभूती शिबिर हदगाव, जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सकाळी ५ ते ८ या वेळेत संपन्न होणार आहे.


शिबिराचे आयोजन शिव पार्वती मंगल कार्यालय, हदगाव येथे करण्यात आले असून, हे शिबिर प्रसिद्ध अध्यात्मिक प्रशिक्षक ज्ञानेशभक्त महेशमहाराज शेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या सहा दिवसीय शिबिरात सहभागी होणाऱ्यांना सुदर्शन क्रिया®, योग व प्राणायाम, ध्यान, सकारात्मक विचारांची उभारणी, आणि दैनंदिन जीवनात आनंद टिकवून ठेवण्याचे तंत्र असे विविध अध्यात्मिक व आरोग्यदायी उपाय शिकवले जाणार आहेत.


शिबिरात सहभागी झाल्यानंतर अनेकांनी आपले जीवन बदलल्याची साक्ष दिली आहे. तणावमुक्त जीवनशैली, उर्जा, आनंद आणि समाधानी दृष्टीकोन प्राप्त होतो, हे अनुभव सिद्ध झाले आहे. या शिबिराचे आयोजन हदगाव परिसरातील जेष्ठ कार्यकर्ते भास्करदादा वानखेडे, अशोकजी टिकोरे, शिरीषजी मनाठकर आणि विश्वासजी देशमुख यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या शिबिरात नोंदणी करण्यासाठी 9604564646, 9834229416 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




